अनेक टीव्ही अभिनेत्री मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्याचबरोबर आपले फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. छोट्या पडद्यावरील अभिनेत्री निया शर्माचाही त्यात समावेश होतो. ती तिच्या अभिनयासोबतच तिच्या ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते. ती अनेकदा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. तिचे चाहते देखील ती नवीन पोस्ट शेअर करण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. नुकताच आता तिने एक ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होत आहे.
नियाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत. नियाने शेअर केलेला हा फोटो पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. तिने या फोटोमध्ये फक्त गुलाबी रंगाचा टॉवेल गुंडाळलेला दिसत आहे. तिने हा फोटो काढताना थोडाही मेकअप केला नाही. त्यामुळे तिचे सौंदर्य अगदी खुलून दिसत आहे. तिच्या या फोटोला तिचे चाहते प्रचंड प्रेम व प्रतिसाद देत आहेत.
नियाने आपले चार फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नियाने पारदर्शक टॉप घातला आहे, जो तिचा बोल्डनेस दाखवत आहे. नियाने पांढऱ्या रंगाचा पारदर्शक टॉप आणि त्या पांढऱ्या रंगाचा बूट घातला आहे. काळ्या रंगाचे शॉर्ट्स आणि काळ्या रंगाचे अंतर्वस्त्र परिधान केले आहेत. या लूकमध्ये अभिनेत्री सिझलिंग दिसत आहे. तिच्या चाहत्यांनाही हे फोटो खूप आवडले आहेत आणि ते या फोटोवर फायर ईमोजी शेअर करून तिचे कौतुक करत आहेत.
मध्यंतरी निया तिच्या ‘दो घुंट’ या गाण्यामुळे चर्चेत होती. या गाण्यात तिला तिच्या कपड्यांसाठी ट्रोल केले गेले होते. त्यानंतर नियाने ट्रोलर्सना योग्य सडेतोड उत्तर देत म्हणाली होती की, “जेव्हा लोकांकडे काहीच काम नसते, तेव्हा ते माझ्या कपड्यांसाठी मला ट्रोल करायला येतात.”
तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘एक हजारों में मेरी बेहना है’, ‘इश्क में मरजावां’, ‘जमाई राजा’, ‘नागिन ४’ मध्ये दिसली आहे. त्याचबरोबर अलीकडेच निया आणि रवी दुबे यांची मालिका ‘जमाई २.०’ प्रदर्शित झाली आहे. या दोघांची जोडी प्रचंड रोमँटिक असल्यामुळे चाहत्यांचे मन जिंकते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मल्हार अडकेल का अंतराच्या प्रेमात? योगिताचा नवीन लूक पाहून, चाहत्यांमध्ये रंगलीय एकच चर्चा