टेलिव्हिजन इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते. ती अनेकदा तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर खूप सक्रिय असणारी ही अभिनेत्री अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी देखील शेअर करते. शनिवारी (६ नोव्हेंबर) तिने ग्लॅमरस फोटो शेअर करून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. यामध्ये ती खूप सुंदर अंदाजात दिसत आहे. ग्लॅमरने भरलेले हे फोटो सर्वत्र वाऱ्यासारखे पसरत आहेत.
नियाचे चाहते देखील तिच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान, तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बोल्ड लूकमधील फोटो शेअर केले आहेत, जे सध्या चर्चेत आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोत तिने पांढऱ्या रंगाचा मिनी स्कर्ट आणि पीच रंगाचा टॉप घातला आहे. स्टायलिश ड्रेसमध्ये नियाचा ग्लॅमरस लूक पूर्ण होत आहे, ज्याचे खूप कौतुक होत आहे.
हा फोटो अपलोड होताच चाहते हार्ट आणि फायर इमोजी टाकून तिच्या लूकचे कौतुक करत आहेत. हा फोटो, फोटो सेशन दरम्यान घेण्यात आला असून, सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तिच्या या फोटोंना आतापर्यंत १ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर निया शर्माने ‘जमाई राजा’, ‘नागिन’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय निया ‘ट्विस्टेड’ वेब सीरिजमध्येही दमदार अभिनय करताना दिसली होती. नुकतीच ती ‘दो घुंट’ या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली. या व्हिडिओतील नियाचा लूक इतका किलर होता की, सगळेच तिच्या लूकने वेडे झाले होते. ‘काली’ या टीव्ही मालिकेमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या नियाने अनेक टीव्ही शोमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘तू कपडे तरी कशाला घालते?’, बोल्ड लूकमुळे निया शर्मा पुन्हा आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर
-भारीच ना! निया शर्माच्या बॅकलेस टॉपने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष; राहुल वैद्यनेसोबत दिली हटके पोझ