Thursday, November 21, 2024
Home हॉलीवूड काय सांगता! टॉम क्रूझशी लग्न केल्यामुळे निकोल किडमनचे करिअर झाले खराब? अभिनेत्रीचा २० वर्षांनी खुलासा

काय सांगता! टॉम क्रूझशी लग्न केल्यामुळे निकोल किडमनचे करिअर झाले खराब? अभिनेत्रीचा २० वर्षांनी खुलासा

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री निकोल किडमन आणि टॉम क्रूझ ही जोडी एकेकाळी सर्वात लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. हे दोघेही आपल्या लव्ह लाईफमुळे चर्चेचा विषय ठरत होते. या दोघांची भेट ‘थंडर’ या चित्रपटादरम्यान झाली होती. त्यानंतर या दोघांनी १९९० मध्ये लग्न केले. ही जोडी जवळपास एक दशक एकत्र राहिली. त्यावेळी त्यांनी दोन मुले देखील दत्तक घेतली होती. मात्र, त्यानंतर या दोघांचा घटस्फोट झाला. त्यांचा घटस्फोट झाला, तेव्हा त्यांचे घटस्फोट आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये चांगलेच चर्चेत होते. निकोल अलीकडेच तिच्या लग्नाबद्दल आणि टॉम क्रूझपासून घटस्फोट घेण्याविषयी बोलली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निकोल किडमनने एक खुलासा केला आहे. तिने सांगितले की, तिचे वैयक्तिक आयुष्य आणि लग्नाकडे इतके लक्ष दिले गेले की, तिच्या अभिनय कारकिर्दीवर त्याचा वाईट परिणाम झाला. निकोलने यासाठी माध्यमांना दोष दिला आहे.

निकोल म्हणाली की, “मी त्यावेळी तरुण होते. मी त्यावेळी नेहमी ओपन राहण्याचा प्रयत्न केला.” निकोल घटस्फोटामुळे खूप दुखावली होती. कारण तिचे करिअर लग्न झाल्यानंतर चांगले चालले नव्हते. टॉम क्रूझपासून विभक्त झाल्यानंतर निकोल किडमनने कीथ अर्बनशी लग्न केले. काही काळानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

निकोलने तिच्या पतीला भेटल्याची सांगितली कहाणी
कीथ अर्बन निकोलच्या आयुष्यात आला. काही काळानंतर दोघांनी लग्न केले. निकोल पुढे म्हणाली की, “कीथ मला भेटला तेव्हा तो म्हणाला की, ‘तुझं हृदय कसं आहे?’ मी म्हणाले होते, ‘ओपन.'”

निकोल पहिल्या भेटीत कीथवर झाली होती इंप्रेस
निकोल आणि कीथ अर्बन ४ महिन्यांनी फोनवर बोलू लागले. निकोल म्हणाली की, “पहिल्या भेटीतूनच मी कीथवर इंप्रेस झाले होते, पण त्याने पुढे जाण्यासाठी थोडा वेळ घेतला. त्याचवेळी, कीथ लगेच म्हणाला की, नाही… नाही हे पूर्णपणे चुकीचे आहे.”

कीथ आणि निकोलची भेट २०१५ मध्ये झाली होती आणि कीथला पहिल्या भेटीत कळले की, निकोल एक दिवस त्याची पत्नी बनेल. १ वर्षांच्या भेटीनंतर दोघांनी सिडनीमध्ये लग्न केले. दोघांनाही आता ३ मुले आहेत.

टॉम क्रूझने २००६ मध्ये केटी होम्सशी लग्न केले. दोघांनाही एक मुलगी आहे. मात्र, २०१२ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. टॉम क्रूझ २०१३ पासून आपल्या मुलीसोबत कधीही दिसला नाही.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोणी म्हणतंय ‘रावणाचा ड्रेस’, तर कोणी ‘पक्षीराज’; विचित्र आउटफिटमुळे ट्रोल झाली उर्वशी

-राज कुंद्राच्या सुटकेनंतर गहना वशिष्ठने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘तू खूप…’

-‘तो केवळ तरुण अभिनेत्रींसोबतच काम करतो’, सलमानसोबत पुन्हा काम करण्याच्या प्रश्नावर भाग्यश्रीने दिले उत्तर

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा