अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्या त्यांच्या चित्रपटांमुळे नाही, तर त्यांच्या सौंदर्यामुळे आणि जबरदस्त बोल्ड स्टाईलमुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावर सतत सक्रिय राहून आपल्या ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना वेड लावणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक असलेली आणि ‘बिग बॉस १४’ची माजी स्पर्धक निक्की तांबोळी देखील अनेकदा तिच्या बोल्ड अवतारामुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा निक्की तेच करताना दिसत आहे. तिने तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अवताराने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले. निक्की तांबोळीने तिच्या सिझलिंग फोटोशूटमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो चाहत्यांची झोप उडवत आहे.
निक्कीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती ब्रालेस अवतारात तिची टोन्ड बॉडी फ्लॉंट करताना दिसत आहे. या फोटोमध्ये निक्की निऑन पॅंटसूटमध्ये थेट कॅमेऱ्याकडे पाहत पोझ देत आहे. तिने हे फोटोशूट फिटलूक मॅगझिन लेटेस्ट कव्हरसाठी केले आहे.
निक्कीने फोटो शेअर करताना एक मजेदार कॅप्शनही लिहिले आहे. ती लिहिले की “मी लोकप्रिय आहे ही माझी चूक नाही आणि तुम्हाला माझा हेवा वाटतो हीदेखील माझी चूक नाही.” तिच्या २.९ मिलियन इंस्टाग्राम फॉलोअर्ससोबत तिचा बोल्ड फोटो शेअर करून तिने तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.
निक्की तांबोळीने ‘चिकाती गाडिलो चिथाकोटुडु’, ‘कंचना ३’ आणि ‘थिप्पारा मीसम’ सारख्या अनेक तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण, ‘बिग बॉस १४’ मधून तिला ओळख मिळाली. बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यानंतर निक्की घराघरात प्रसिद्ध झाली. ‘बिग बॉस १४’ च्या माध्यमातून तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
‘बिग बॉस १४’ मधील टास्क दरम्यान १००% देण्याव्यतिरिक्त, निक्की जान कुमार सानू, रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांच्यासोबतच्या तिच्या चांगल्या संबंधांमुळे देखील चर्चेत होती. यानंतर निक्की तांबोळी रोहित शेट्टीच्या स्टंट आधारित रियॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी ११’ चा देखील भाग होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-प्रभास अन् पुजा हेगडेचा ‘राधे श्याम’ रिलीझपूर्वीच लीक! ‘अशी’ काहीशी आहे चित्रपटाची कथा
-दहावीत असताना होती पहिली गर्लफ्रेंड, चित्रपटांप्रमाणेच रंगतदार होती कार्तिक आर्यनची लव्हलाईफ
-अरे वा! अखेर ‘देवमाणूस’चा पुढचा भाग येणार प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर प्रोमो व्हायरल