Saturday, July 6, 2024

हॉटनेसचा तडका! शॉर्ट ड्रेसमध्ये निक्की तांबोळी झाली ‘खतरों के खिलाडी’च्या सेटवर स्पॉट

‘बिग बॉस १४’ ची स्पर्धक निक्की तांबोळी सध्या जोरदार चर्चेत आहे. ती सध्या लोकप्रिय रियॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’मध्ये आहे. निक्की टेलिव्हिजनवरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. बिग बॉसमध्ये आपल्या सगळ्यांना तिचे जलवे पाहायला मिळाले आहेत. तसेच ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये देखील ती अनेक खतरनाक स्टंट करताना दिसत आहे. अशातच निक्की ‘खतरों के खिलाडी’ या शोच्या सेटवर स्पॉट झाली आहे. तेथील तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

व्हायरल भयानीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून निक्कीचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, निक्कीने जांभळ्या आणि राखाडी रंगाचा एक शॉर्ट ड्रेस घातला आहे. तसेच पायात राखाडी रंगाचे हाय हिल्स घातले आहेत. यासोबत तिने तिचे सगळे मोकळे सोडलेले दिसत आहेत. या ड्रेसमध्ये ती खूप ग्लॅमरस दिसत असून पॅपराजींना वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (Actress nikki tamboli spot on khatron ke Khiladi set)

‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये निक्की फायनलपर्यंत पोहोचली आहे. तिचा शोमधील परफॉर्मन्स देखील सर्वांना खूप आवडत आहे. तिने या आधी अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये देखील काम केले आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये येण्याआधी निक्कीच्या भावाचे निधन झाले होते. भावाच्या निधनानंतर काही दिवसांनी ती शूटिंगसाठी केपटाऊनला गेली होती. त्यामुळे सोशल मीडियावर तिला खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल केले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लईच वाईट झालं! वयाच्या २५ व्या वर्षी मराठी अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा अपघातात मृत्यू

-‘पुरुषाचे शरीर’, म्हणणाऱ्या युजरला तापसी पन्नूचे खणखणीत प्रत्युत्तर; म्हणाली, ‘फक्त ही ओळ लक्षात ठेव…’

-‘बिग बॉस मराठी’तील ‘या’ स्पर्धकाचा झालाय दोनदा घटस्फोट, घरात करावा लागतोय पहिल्या पतीशी सामना

हे देखील वाचा