Monday, March 16, 2026
Home बॉलीवूड विचित्र एक्सप्रेशन देत निक्कीने मागितली पॅपराजींकडे तिच्या वाढदिवसाची पार्टी, व्हिडिओ भन्नाट व्हायरल

विचित्र एक्सप्रेशन देत निक्कीने मागितली पॅपराजींकडे तिच्या वाढदिवसाची पार्टी, व्हिडिओ भन्नाट व्हायरल

प्रत्येक लहान मोठ्या कलाकारांच्या मागे पॅपराजीची फौज नेहमीच आपल्याला दिसत असते. कलाकारांच्या सर्व ऍक्टिव्हिटीवर हे पॅपराजी त्यांच्या तिसऱ्या डोळ्याने नजर ठेऊनच बसलेले असतात. यात टीव्ही कलाकार किंवा चित्रपट कलाकार दोघं क्षेत्रातील कलाकारांचा समावेश आहे. या पॅपराजीच्या नजरेतून कोणताच कलाकार कधीच सुटत नाही.

बिग बॉसमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री निक्की तांबोळीला देखील या पॅपराजींनी नुकतेच त्यांच्या कॅमेरामध्ये कैद केले आहे. निक्कीचा हा विडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत असून, त्यावर फॅन्सच्या वेगवेगळ्या कमेंट्स येत आहे. या व्हिडिओमध्ये निक्कीने पिवळ्या रंगाचा टी शर्ट आणि डेनिम घातली असून, या व्हिडिओमध्ये ती विचित्र एक्सप्रेशन देताना दिसत आहे. (nikki tambolis weird expression )

सोबतच तिचे काही फॅन्स तिच्यासोबत फोटो देखील काढताना दिसत आहे. तिने कॅमेराकडे पाहून दिलेले एक्सप्रेशन पुन्हा देण्याची विनंती देखील फोटोग्राफर तिला करताना आपण पाहून शकतो. ती तेच एक्सप्रेशन पुन्हा दयायला नाही म्हणते, मात्र तिच्या गाडी बसल्यावर सर्वांसाठी पुन्हा तसे एक्सप्रेशन देत आहे. शिवाय तिने पॅपराजींकडे तिच्या वाढदिवसाची पार्टी देखील मागितली आहे.

निक्की एक मॉडल आणि अभिनेत्री असून तिने ‘कंचना 3’, ‘चिकती गदिलो चित्रकोट्टु’ आणि ‘थिप्पारा मीसम’ यांसारख्या दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. निक्कीने सुरुवातीला मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली आणि नंतर टीव्ही जाहिरातींमध्ये झळकू लागली. तिने तमिळ, तेलगू चित्रपटांत काम केले असून, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे राहणारी निक्की तांबोळीचा जन्म 21 ऑगस्ट 1996 मध्ये झाला. निक्कीचे शालेय शिक्षण औरंगाबादमध्ये पूर्ण झाले आहे. सध्या निक्की खतरो के खिलाडी या शोमध्ये दिसत असून, शोमधील तिच्या काही निर्णयामुळे, चुकांमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल देखील केले जात आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कुंद्राच्या अटकेदरम्यान शिल्पा शेट्टीने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘मी चूक केलीय…’

-ज्याला राम गोपाल वर्मा म्हणाले होते, ‘हा मी नाही’; तोच व्हिडिओ शेअर करत इनाया म्हणतेय, ‘हे आम्हीच…’

केबीसी: उत्तर माहित असूनही स्पर्धक आशीष सुवर्णाने घेतली नाही रिस्क, ‘या’ प्रश्नावर क्विट करत सोडला शो

 

 

 

 

हे देखील वाचा