Friday, August 1, 2025
Home अन्य निशाने दिला पती करणकडून एक रुपयाही घेण्यास नकार; म्हणाली, ‘मला फक्त…’

निशाने दिला पती करणकडून एक रुपयाही घेण्यास नकार; म्हणाली, ‘मला फक्त…’

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक कलाकाराचे विवाह बाह्य संबंध असल्याचे अनेक किस्से समोर येतात. अनेकवेळा तर एखादे गोड जोडपे त्यांच्या प्रेमामुळे चर्चेत असते, तर तेच जोडपे कधी त्याच्या भांडणामुळे व घटस्फोटामुळे चर्चेत असतात. अशात करण मेहरा आणि निशा रावल यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सध्या चांगल्याच चर्चेत आहेत.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेमधून घराघरात पोहोचलेला करण मेहरा आता घटस्पोटाच्या कचाट्यात अडकला आहे. साल २०१२ मध्ये करणने निशा रावलबरोबर विवाह केला होता. त्यांनतर २०१७ मध्ये या दोघांनी एका बाळाला जन्म दिला. सध्या त्या दोघांचे पटत नसल्याने त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. (Actress Nisha rawal on divorce with Karan mehra want sons custody)

निशाने तिचा पती करण मेहरावर कौटुंबिक अत्याचाराचा आरोप केला आहे. तसेच त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचेही सांगितले. पोलिसात त्याची तक्रार करून त्याच्या विरोधात एफआयआर दाखल केली. त्यांनतर त्याला अटक करण्यात आली. यादरम्यान कोर्टामध्ये खटला सुरू होता. त्यावेळी करणने त्याच्या पत्नीने त्याच्याकडे पोटगीसाठी मोठी रक्कम मागितली असल्याचा आरोप केला होता. त्याच्या या आरोपांना प्रतिउत्तर देत निशाला नेमकं काय हवं आहे, हे तिने सांगितले आहे.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये निशाने असे म्हटले आहे की, “मला करणकडून एका रुपयाचीही अपेक्षा नाही. मी एक स्वतंत्र महिला आहे. मला माझा सांभाळ करत येतो. मला माझ्या मुलाचा ताबा द्या.”

करणच्या विवाहबाह्य संबंधांना व कौटुंबिक जाचाला कंटाळून निशाने हे पाऊल उचलले आहे. निशा आणि करणच्या मुलाचा म्हणजेच कवीशचा काही दिवसांपूर्वी वाढदिवस होता. त्यावेळी कारणने त्याच्या वाढदिसानिमित्त त्याच्यासाठी घेतलेल्या गिफ्टचा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला होता. परंतु ते गिफ्ट अजून कवीशपर्यंत पोहोचलेच नाही. तसेच अद्याप त्याने आपल्या मुलाला एक फोन देखील केला नाही.

या सर्वांमुळे करणला आपल्या मुलाची जराही काळजी नाही, तो त्याला नीट सांभाळू शकत नाही, असं निशाला वाटत आहे. त्यामुळे आपल्या मुलाचा ताबा तिने स्वतःकडे मागितला आहे. करणला हवं तेव्हा तो आपल्या मुलाला भेटायला येऊ शकतो, असं निशाचं म्हणणं आहे.

तसेच निशाने करणकडून स्वतःचे दागिने देखील मागितले आहेत. तिच्या आईच्या जमिनीचे कागदपत्र देखील त्याच्याकडे आहेत, त्यामुळे तेही परत द्यावेत, असं निशाने सांगितले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘अपना टाइम आएगा’ म्हणत राणीने चॅटर्जीने शेअर केला व्हिडिओ; नेटकरी म्हणतायेत, ‘अजून किती बारीक व्हायचंय’

-एका वर्षानंतर अचानक सक्रिय झाले सुशांतचे फेसबुक अकाऊंट; चाहते म्हणाले, ‘काश तू जीवंत असता…’

-अभिनेत्री लीजा हेडनने शेअर केले मुलीला स्तनपान करतानाचे फोटो; पोस्टवर उमटतायेत जोरदार प्रतिक्रिया

हे देखील वाचा