Tuesday, October 14, 2025
Home टेलिव्हिजन कलाविश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, दोन दिवसापूर्वीच केला होता 50वा बड्डे साजरा

कलाविश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, दोन दिवसापूर्वीच केला होता 50वा बड्डे साजरा

कलाविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. या बातमीने कलाविश्व हादरले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री निशी सिंग यांचे निधन झाले आहे. त्यांनी रविवारी (दि. 18 सप्टेंबर) या जगाचा निरोप घेतला. त्या दीर्घ काळापासून आजारी होत्या. त्यांना पॅरालिसिसचाही झटका बसला होता, त्यामुळे त्यांची तब्येत जास्तच बिघडली होती. निशी सिंग या 50 वर्षांच्या होत्या. विशेष म्हणजे, 2 दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांचा 50वा वाढदिवस साजरा केला होता.

अभिनेत्री निशी सिंग (Nishi Singh) या ‘कुबूल है’, ‘इश्कबाज’, ‘तेनाली राजा’ यांसारख्या मालिकांसाठी ओळखल्या जायच्या. निशी यांच्या निधनामुळे (Nishi Singh Death) कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. निशी सिंग यांचे पती संजय सिंग हेदेखील मनोरंजन क्षेत्राशी जोडलेले आहेत. ते एका अभिनेत्यासोबतच लेखकही आहेत. त्यांनी पत्नीच्या निधनाची माहिती दिली.

ते म्हणाले की, “निशी सिंगला एका वर्षापूर्वी दुसरा स्ट्रोक आला होता, त्यानंतर तिची तब्येत खूपच खालावली होती. तिला नंतर रुग्णालयात दाखल केले होते, जिथून तिला डिस्चार्ज करण्यात आले होते. मात्र, काही आठवड्यांपासून निशी सिंगची तब्येत पुन्हा खराब झाली होती.”

यादरम्यान संजय सिंग यांनी त्यांची पत्नी निशी यांच्या शेवटच्या इच्छेबद्दलही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, “घशाच्या संसर्गामुळे ती काही दिवस अन्नात फक्त द्रवच घेत होती. दोन दिवसांपूर्वी आम्ही निशीचा 50वा वाढदिवस साजरा केला आहे. त्यावेळी ती हळूहळू बोलू शकत होती. तसेच, ती खुशदेखील दिसत होती. मी तिला त्याच्या आवडत्या बेसनाचे लाडू खाण्याची विनंती केली आणि तिने ते खाल्लेही होते.”

निशी सिंग यांची आर्थिक स्तिथीदेखील चांगली नव्हती, त्यामुळे संजय त्यांच्या पत्नीचे उपचार व्यवस्थित करू शकत नव्हते. अशात संजय यांनी या इंडस्ट्रीतील लोकांकडेही आर्थिक मदतीसाठी विनंती केली होती. यावेळी अभिनेत्री सुरभी चंदना आणि इंडस्ट्रीतील इतर लोकांनी त्यांना आर्थिक मदत केली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हुमा कुरेशीला आवडत नाहीत अभिनेते? ‘ही’ अभिनेत्री आहे तिची क्रश, स्वत:च केला खुलासा
‘छीsss!’ पारंपारिक पोशाखात अभिनेत्रीने ओढली सिगारेट, हातात दारूचा ग्लास बघताच संतापले चाहते
अनुष्काने पतीच्या आठवणीत लिहिली भावूक पोस्ट, विराटनेही दिला असा रिप्लाय की, सर्वत्र रंगली एकच चर्चा

हे देखील वाचा