Friday, October 17, 2025
Home मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा दिलखेचक फोटोवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा दिलखेचक फोटोवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

नव्वदच्या दशकातील अशा खूप कमी अभिनेत्री आहेत, ज्या आजही प्रेक्षकाच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. यातील एक नाव म्हणजे निवेदिता सराफ होय. निवेदिता या मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान अभिनेत्री आहेत. मराठी चित्रपटात काम केल्यानंतर त्यांनी मराठी मालिकांमध्ये देखील मोलाचे योगदान दिले आहे. त्या सोशल मीडियावर देखील बऱ्यापैकी सक्रिय असतात. अशातच नवरात्रीचे औचित्य साधून त्यांनी रंगानुसार साडी परिधान करून फोटो शेअर केले आहेत.

निवेदिता सराफ यांनी अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी देवीच्या तिसऱ्या दिवसाच्या राखाडी रंगाची साडी परिधान केली आहे. तसेच राखाडी रंगाचा ब्लाऊज घातला आहे. तसेच ऑक्साईड ज्वेलरी घातली आहे. या फोटोमध्ये त्या फारच सुंदर दिसत आहेत. (Actress Nivedita saraf share her gray color saree photo on social media)

हा फोटो शेअर करून त्यांनी लिहिले आहे की, “आजचा रंग राखाडी, स्थिरतेचा, कौशल्य आणि शिस्तबद्धतीचे रंग म्हणजे राखाडी.” त्यांनी शेअर केलेला हा फोटो त्यांच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यांच्या एका चाहत्याने या फोटोवर “सौंदर्यवती,” अशी कमेंट केली आहे. आणखी एकाने “अती सुंदर,” अशी कमेंट केली आहे. तसेच बाकी चाहते देखील सातत्याने या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

निवेदिता सराफ या मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी ‘अशी ही बनवा बनवी’, ‘धूमधडाका’, ‘थरथराट’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘देऊळ बंद’, ‘माझा छकुला’, ‘फेका फेकी’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. तसेच त्यांनी झी मराठीवरील ‘अगंबाई सूनबाई’ आणि ‘अगंबाई सासूबाई’ या मालिकेत काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात होणार पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री, प्रेक्षक लावतायेत अंदाज

-कौतुकास्पद! मराठमोळ्या पूजा सावंतने ‘हे’ महत्त्वाचं अभियान घेतलं हाती, फोटो आले समोर

-‘हे नक्की शाल्विताच का?’ ओम अन् स्वीटूच्या ‘त्या’ व्हिडिओवर रंगल्यात चाहत्यांच्या चर्चा

हे देखील वाचा