Wednesday, June 26, 2024

शोमध्येच नोरा फतेहीने रुमर्ड बॉयफ्रेंड गुरु रंधावाला केली किस, अफेअरच्या चर्चेला मिळाली हवा!

‘द कपिल शर्मा शो’च्या नवीन प्रोमोमध्ये गुरु रंधावा (Guru Randhawa) आणि नोरा फतेही (Nora Fatehi) दिसले. या वीकेंडच्या शोमध्ये ते त्यांच्या नवीन व्हिडिओ ‘डान्स मेरी रानी’चे प्रमोशन करणार आहे. दरम्यान, असे काही घडले की, नोराने तिच्या आणि गुरु रंधावाच्या नात्याच्या बातम्यांना जोर दिला.

कपिलने विचारला मजेशीर प्रश्न
होस्ट कपिल शर्माने नोराबद्दल बोलून गुरुची खिल्ली उडवली आणि म्हणाला की, “मागील व्हिडिओमध्ये तू तिला रोबोट बनवलंस, या व्हिडिओमध्ये तू तिला जलपरी बनवलंस, खरं सांग, तुझ्या मनात तिला नक्की काय बनवायचं आहे?” गुरु हसला आणि म्हणाला की, पुढच्या वेळी तो शोमध्ये येईल तेव्हा त्याला या प्रश्नाचे उत्तर देईल.

कपिल करतो नोराची नक्कल
कपिलने नोराला विचारले की, गुरुच्या पहिल्या म्युझिक व्हिडिओ ‘नाच मेरी रानी’पासून त्याच्या डान्समध्ये सुधारणा झाली आहे का? ती म्हणाली की, “खरं तर मला वाटते की, तो माझ्यासोबत नसेल, तर तो नाचत नाही.” याच्या पुढे कपिल म्हणाला, “बाकीच्या म्युझिक व्हिडीओमध्ये तो एकच गोष्ट करतो” आणि कपिल त्याचे हात एकमेकांवर एकत्र घासून त्याची नक्कल करतो.

नोरा सर्वांसमोर करते किस
गुरु रंधावाने येथे तक्रार केली की, “ती मतलबी आहे” आणि नोराने किस करून त्याला गप्प केले. कपिलने विचारले की, एका मुलाला दुखावण्यासाठी तिने गुरूची किस घेतली आहे का? नोराने उत्तर दिले “अगदीच.”

नुकतेच नोरा आणि गुरु रंधावा समुद्र किनाऱ्यावर वेळ घालवताना दिसले. यानंतर त्यांच्या नात्याची बातमी समोर आली. सोशल मीडियावर युजर्सने दोघांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

नोराच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर ती सध्या उच्चांकावर आहे. अलिकडेच ‘भुज – द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटातील तिची भूमिका चाहत्यांना खूप आवडली होती. तसेच या चित्रपटात अजय देवगण तिच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसला. एवढेच नाही, तर नोरावर चित्रित केलेली गाणी सुपरहिट होत आहेत. तिची फॅन फॉलोविंग दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. नोराने ‘दिलबर’ आणि ‘गर्मी’ सारख्या गाण्यांनी आपली खास ओळख निर्माण केली आहे. नोरा ‘बिग बॉस’च्या घराचाही एक भाग राहिली आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा