Friday, April 25, 2025
Home बॉलीवूड ‘कारण मी प्रेग्नंट नाहीये’, दोन्ही जजेसमोर हे काय बोलून गेली नोरा फतेही, व्हिडिओ होतोय जोरात व्हायरल

‘कारण मी प्रेग्नंट नाहीये’, दोन्ही जजेसमोर हे काय बोलून गेली नोरा फतेही, व्हिडिओ होतोय जोरात व्हायरल

‘दिलबर दिलबर’, ‘हाय गर्मी’, ‘ओ साकी साकी’ यांसारख्या गाण्यात आपल्या अदाकारीचा जलवा दाखवणारी अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही होय. परदेशातून भारतात येऊन बॉलिवूडमध्ये आपले खास स्थान निर्माण करण्याची मोठी कामगिरी नोराने करून दाखवली आहे. कामांव्यतिरिक्त सोशल मीडियावरही तिचा चांगलाच वावर असतो. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होताच, तुफान व्हायरल होत असतात. नोरा ही अविवाहित आहे. असे असूनही तिने ती प्रेग्नंट नाही असे म्हटले आहे. नोराच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. चला तर जाणून घेऊया नोरा असे का म्हणाली?

नोरा करतेय रियॅलिटी शोचे परीक्षण
अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) ‘डान्स दीवाने ज्युनिअर्स’ (Dance Deewane Juniors) या शोचे परीक्षण करत आहे. यामध्ये सहाय्यक परीक्षक नीतू कपूर आणि कोरिओग्राफर मर्जी पेस्तोंजीदेखील आहेत. या शोच्या सेटवरून नोराचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये ती म्हणत आहे की, ती प्रेग्नंट नाहीये.

व्हिडिओने खोलली पोल
नोरा फतेही हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ या रिऍलिटी शोच्या सेटवरील आहे. या व्हिडिओमध्ये नोराशिवाय दया, नीतू कपूर आणि टेरेन्स लुईस दिसत आहेत. व्हिडिओमध्ये मर्जी म्हणत आहे की, “आम्ही तिघेही गरोदरपणातील वेदनांबद्दल चर्चा करत आहोत, पण नोरा स्वतःला पाहण्यात व्यस्त आहे.” त्यावर नोरा लगेच म्हणते की, “कारण मी प्रेग्नंट नाही.” यानंतर मर्जी म्हणतो की, “लोकांना ही गोष्ट सांगितल्याबद्दल धन्यवाद.”

गुलाबी साडीत पाहायला मिळाला नोरा फतेहीचा अंदाज
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत अभिनेत्री नोरा फतेही गुलाबी साडीत दिसत आहे. अभिनेत्रीने या साडीसोबत डीपनेक असणारा रिव्हिलिंग ब्लाऊज परिधान केला आहे. हा तिच्या साडीतील लूकला आणखीच ग्लॅमरस बनवत आहे. तिच्या गुलाबी साडीतील लूकचे फोटो नोराच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर झळकत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

नेहमीच शांत असणारी शहनाझ ‘या’ गोष्टीवर भडकली, पॅपराजींच्या कॅमेऱ्यात कैद झाला महत्त्वाचा क्षण

प्रविण तरडेंना शाहीर दादासाहेब कोंडके पुरस्कारने केले सन्मानित, सोशल मीडियावर खास पोस्ट करत दिली माहिती

फक्त ‘या’ एका कारणामुळे बंद होणार ‘साथ निभाना साथिया २’, गेहना बहूने केला खुलासा

हे देखील वाचा