गेल्या दोन वर्षांपासून कोरोना नावाच्या विषाणूने अक्षरशः थैमान घातले आहे. या सगळ्याचाच परिणाम मनोरंजन क्षेत्रावर देखील झाला आहे. अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रभाव कमी झाल्याने सरकारने अनेक नियम शिथिल केले होते. अशातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती जाणवत आहे. कोरोना रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. बॉलिवूडमधील काही कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. अशातच अशी माहिती समोर आली आहे की, अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही हिला कोरोनाची लागण झाली आहे.
नोरा फतेहीची तब्येत ठीक नसल्याने ती डॉक्टरांकडे तपासणी करण्यासाठी गेली होती. मंगळवारी (२८ डिसेंबर) रोजी तिचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. तिची तब्येत आता ठीक आहे आणि ती आता डॉक्टरांच्या देखरेदीखाली आहे. या बातमीने तिच्या चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण पसरले आहे. (actress nora fatehi’s covid 19 test positive)
नोरा फतेही ही एक उत्कृष्ट डान्सर तसेच अभिनेत्री आहे. तिने अनेक गाण्यांमध्ये डान्स केला आहे. तिच्या ‘दिलबर’ या गाण्याने तर सगळ्या गाण्यांचे रेकॉर्ड तोडून टाकले होते. नंतर ती ‘स्ट्रीट डान्सर 3’ मध्ये देखील दिसली होती. तिने ‘ओ साकी साकी’, ‘कमरीया’, ‘एक तो कम जिंदगानी’ या सुपरहिट गाण्यांवर डान्स केला आहे. तसेच तिचे ‘हाय गर्मी’ हे गाणे लोकप्रिय झाले आहे. ती लवकरच ‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच ती. अजय देवगन आणि सोनाक्षी सिन्हासोबत ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात देखील दिसलीआहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी तिचे ‘कुसु कुसू’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे.
हेही वाचा :
मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमच ऑडिशनमधील विजेत्या कलाकारांचा रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव
अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने २०२१ वर्षात त्याला मिळालेल्या यशासाठी मानले प्रेक्षकांचे आभार, म्हणाला…
शर्वरी वाघ आहे सनी कौशलसोबत रिलेशनशिपमध्ये? स्वतःच सांगितले त्यांच्या नात्याचे सत्य