Friday, June 13, 2025
Home बॉलीवूड जेव्हा पुरुषांच्या शौचालयात गेली होती नुसरत भरुचा, जाणून घ्या पुढं काय झालं?

जेव्हा पुरुषांच्या शौचालयात गेली होती नुसरत भरुचा, जाणून घ्या पुढं काय झालं?

नुसरत भरुचा (nusarat bharucha) आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटांव्यतिरिक्त ती तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते. एका दशकापेक्षा कमी कालावधीच्या कारकिर्दीत, नुसरत भरुचाने चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे. अशात नुसरत बुधवारी (दि. 17 मे)ला तिचा 38वा वाढदिवस साजरा करणार आहे. यानिमित्त नुसरत भरुचाशी संबंधित एक किस्सा जाणून घेऊया, ज्याची अभिनेत्रीला आजही खंत वाटते.

नुसरतने स्वत: केला होता खुलासा
नुसरत भरुचाने एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला असून ही, मुलाखत ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिली होती. ‘ड्रीम गर्ल’मध्ये असे अनेक सीन होते, ज्यामध्ये एक पुरुष दुसऱ्या पुरुषाशी फोनवर मुलीच्या आवाजात बोलतो. नुसरतला तिच्या आयुष्याशी संबंधित अशाच एका घटनेबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तिने एक खुलासा केला.

नुसरतने केली ‘इतकी’ मोठी चूक
नुसरत भरुचा म्हणाली, “हो, माझ्यासोबतही असेच काहीसे घडले आहे. मी चुकून पुरुषांच्या शौचालयात गेले होते. सुदैवाने आत कोणीच नव्हते आणि मी लगेच बाहेर आलो.” ती म्हणाली होती की, आजकाल महिला आणि पुरुषांच्या टॉयलेटच्या दारावर डिझाईन असतात, त्यामुळे काही वेळा ओळखणे कठीण होते.

नुसरतचे करियर
नुसरत भरुचाने 2006मध्ये ‘जय संतोषी माँ’ या मालिकेतून तिच्या करियरची सुरुवात केली होती. यानंतर ती ‘कल किसने देखा’, ‘लव्ह सेक्स और धोखा’मध्ये दिसली. मात्र, 2011मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून तिला खरी ओळख मिळाली. याशिवाय नुसरत ‘सोनू की टीटू की स्वीटी’ आणि ‘ड्रीम गर्ल’मध्येही दिसली आहे. (actress nushrratt bharuccha know about her unknown facts)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मराठमाेळ साजमध्ये रिंकू राजगुरूने चालवली गाडी, व्हिडिओ व्हायरल

अमृता खानविलकरने शेअर केला ‘मस्तानी’ लूक, फाेटाे व्हायरल

हे देखील वाचा