Wednesday, July 3, 2024

आनंदाची बातमी! अभिनेत्री नुसरत जहाँ बनली आई; पण मुलगा झाला की, मुलगी?

सिनेविश्वातून आनंदाची बातमी येत आहे. अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेस खासदार नुसरत जहाँच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. तिने काही वेळापूर्वीच मुलाला जन्म दिला आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, बुधवारी (२५ ऑगस्ट) अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला बंगाली अभिनेता यशदास गुप्ता रुग्णालयात घेऊन आला होता.

नुसरतच्या प्रेग्नंसीच्या बातमीमुळे चांगलाच वाद पेटला होता. बेबी बंपसोबत तिचे फोटो समोर आल्यानंतर तिचा पती निखिल जैनने दावा केला होता की, तो तिच्यापासून दूर राहत आहे. तसेच प्रेग्नंसीबाबत त्याला कोणतीही माहिती नाही. लग्नाबाबत चालू असलेल्या या वादामध्ये अभिनेत्रीने आपले पूर्ण लक्ष आपल्या मुलावर ठेवले. ती कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करण्यापासून स्वत:ला दूर ठेवताना दिसली आहे. मात्र, गुरुवारी (२६ ऑगस्ट) तिने आपल्या चाहत्यांसोबत मुलाला जन्म दिल्याची आनंदाची बातमी दिली आहे.

डिलीव्हरीपूर्वी नुसरतने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.

निखिल जैनसोबत लग्नानंतर राहिली दूर
नुसरत जहाँने वर्ष २०१९मध्ये प्रसिद्ध व्यावसायिक निखिल जैन याच्याशी मोठ्या थाटामाटात लग्न केले. हा विवाह तुर्कीमध्ये पार पडला. यानंतर, दोघांनी कोलकाता येथे एका रिसेप्शनचे नियोजन केले होते. ज्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह बंगाली चित्रपट उद्योगातील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. मात्र, हे लग्न फार काळ टिकले नाही. २०२० मध्ये निखिल आणि नुसरतच्या नात्याबद्दल तिने स्वत:च खुलासा केला. तिचे लग्न तुर्कीच्या कायद्यानुसार त्यांचा विवाह मंजूर नव्हता.

यावर्षी अभिनेता यश दासगुप्ता आणि नुसरतच्या विषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान, जेव्हा नुसरत जहाँच्या गरोदरपणाची बातमी समोर आली, तेव्हा निखिल जैनने त्याबाबत प्रश्न उपस्थित केले. निखिलने या गर्भधारणेपासून स्वतः दूर राहून नुसरतबद्दल मोठे वक्तव्य केले होते. त्यांच्या लग्नातील वादादरम्यान, जैनने म्हटले होते की, “तो आणि नुसरत जहाँ नोव्हेंबर २०२०मध्ये या नात्यातून विभक्त झाले आहेत आणि त्यांनी विवाह रद्द करण्यासाठी अर्जही दाखल केला होता.”

नुसरतचे चित्रपट
नुसरतने सन २०११ साली ‘शात्रू’ या बंगाली चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने ‘खोका ४२०’, ‘खिलाडी’, ‘हर हर व्योमकेश‘, ‘झुल्फिकार’ यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मोनालिसाने ‘साड़ी के फॉल सा’ गाण्यावर लावले जोरदार ठुमके; सोनाक्षीचाही डान्स वाटेल तिच्यासमोर फिका

-‘पद्मावत’ फेम सरभ आहे मानसशास्त्राचा पदवीधर; रणवीरला त्याची ‘ही’ गोष्ट आवडल्याने मिळाला चित्रपट

-जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या एका प्रश्नासाठी बिग बींनी मागितली माफी; केली होती ‘ही’ चूक

हे देखील वाचा