Tuesday, July 9, 2024

निखिल जैनसोबत लग्नाच्या वादावर नुसरतने सोडले मौन; म्हणाली, ‘लग्नासाठीही पैसेही दिले नाहीत…’

तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या निखिल जैनसोबतच्या लग्नाबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. आता नुसरतने निखिल जैनसोबतच्या पहिल्या लग्नाच्या वादावर मौन सोडले आहे. अभिनेत्री नुसरत जहाँने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, या संपूर्ण प्रकरणात तिची इमेज चुकीच्या पद्धतीने सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

निखिल जैनसोबतचे लग्न बेकायदेशीर ठरवल्याने नुसरत अचानक चर्चेत आली. नुसरतने म्हटले होते की, तुर्कस्तानच्या रितीरिवाजांनुसार तिचे लग्न झाले होते, जे भारतीय कायद्यानुसार वैध नाही. निखिलपासून घटस्फोट घेण्याचीही गरज नाही, कारण, ते एक प्रकारचे लिव्ह-इन रिलेशनशिप होते, असेही ती म्हणाली होती. यानंतर सोशल मीडियावर याबद्दल अनेक गोष्टी रंगल्या होत्या.

तिच्या लग्नाबद्दल बोलताना नुसरत म्हणाली की, “त्याने या लग्नासाठी पैसेही दिले नव्हते. हॉटेलचे बिलही भरले नव्हते. मला त्याला काहीही सांगण्याची गरज नाही. मी प्रामाणिक आहे. माझी चूक आहे. हे दाखवण्यात आले आणि आता मी ते स्पष्ट केले आहे.” कोणाचेही नाव न घेता ती म्हणाली की, “इतरांना दोष देणे सोपे आहे आणि तिने कोणालाही वाईट मार्ग दाखवला नाही.”

नुसरतच्या गरोदरपणावरून याआधी बराच वाद झाला होता. तिने मुलाला जन्म दिला, तेव्हा सोशल मीडियावर मुलाच्या वडिलांबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. कोलकाता महानगरपालिकामध्ये देबाषीश दासगुप्ता नाव लिहिले आहे. जे यश दासगुप्ताचे पूर्ण नाव आहे.

२ वर्षांपूर्वी झाले होते लग्न
निखिल जैन आणि नुसरत जहाँ यांचा १९ जून, २०१९ रोजी मोठ्या थाटामाटात लग्न झाले होते. दोघांचे लग्न तुर्कीच्या लग्नाच्या नियमानुसार झाले होते. त्याआधारे नुसरतने निखिलपासून विभक्त होण्यासाठी घटस्फोटासाठी अर्ज करण्यास नकार दिला. तुर्कस्तानचा कायदा भारतात वैध नाही, त्यामुळे तिच्या लग्नालाही येथे मान्यता नाही, असे नुसरतचे म्हणणे आहे. निखिलने सांगितले की, लग्नाची नोंदणी करण्यासाठी वारंवार विचारणा करूनही नुसरतने त्याचे ऐकले नाही आणि टाळाटाळ केली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘राधे श्याम’च्या दिग्दर्शकाविरोधात प्रभासच्या चाहत्याने लिहिली सुसाईड नोट, दिली मरण्याची धमकी

-द बिग पिक्चर शोच्या सेटवर लहान मुलांना पाठीवर बसून फिरवताना दिसला सलमान खान

-‘सिंहीण परत आलीये…’, सुष्मिता सेनच्या ‘या’ खतरनाक स्टाइलने उडणार होश

हे देखील वाचा