बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राचा भाऊ सहज चोप्राने नुकतेच फरीदाबादमध्ये स्वतःचे रेस्टॉरंट उघडले आहे. अभिनेत्रीने त्याच्यासाठी एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. बिर्याणी, दाल मखनी, चिकन कबाब आणि बटर चिकन खाताना अभिनेत्रीने अनेक फोटोही शेअर केले आहेत. यासोबत भाऊ सहज देखील दिसत आहे. परिणीती ही फूडी असून, तिला खाणे पिणे खूप आवडते हे फोटोंवरून लक्षात येते.
अभिनेत्रीने लिहिली पोस्ट
परिणितीने (Parineeti Chopra) लिहिले की, “आम्ही उत्तम पंजाबी खाद्यपदार्थ खात मोठे झालो. कोणत्याही रेस्टॉरंटचे खाद्यपदार्थ आम्हाला संतुष्ट करत नाहीत. दाल जास्त चविष्ट नव्हती, बटर चिकन थोडे जास्त गोड होते, कधी कधी जेवण फक्त तेलकट किंवा अचविष्ट होते. सहजने खूप आधीच निर्णय घेतला की, तो त्याच्या आवडते जेवण बनवेल आणि त्या प्रकारची चव देखील, जी पंजाबी लोकांना आवडेल. स्वादिष्ट जेवण इथे मिळेल. @theolddelhi.”
परिणीतीने पुढे लिहिले की, “ही उत्कृष्ट कलाकृती तयार केल्याबद्दल मला तुझा खूप अभिमान वाटतो. मला वाटते की, कदाचित मास्टरपीस हा शब्द त्याच्या चवीसमोर लहान असेल. मी आजपर्यंत इतके अप्रतिम अन्न कधीच खाल्ले नाही. मसूर तोंडात विरघळतो. होय, बिर्याणी एकदम मसालेदार आहे. पनीर इतके मऊ आहे की, तुम्हाला चावण्याचीही गरज नाही. माझ्या कुटुंबाला मांसाहारी कबाब आणि चिकन सर्वात जास्त आवडते. तीन दिवसांपासून दुसरे काहीही खाल्ले नाही. मी थोडी भावनिक होत आहे.”
परिणीती चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि बोनम इराणी यांच्यासोबत ‘ऊंचाई’ चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय परिणीती रणबीर कपूरसोबत ‘ऍनिमल’मध्ये दिसणार आहे. अलिकडेच या अभिनेत्रीने टीव्हीवर पदार्पण केले आहे. करण जोहर आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत ‘हुनरबाज’मध्ये ती परीक्षकाच्या भूमिकेत आहे.
हेही वाचा :
Video: देश बदललाय पण संस्कार तेच! परदेशी स्वयंपाक्यालाही प्रियांकाने आरती करायला शिकवले
ओहह! करीना आणि रिया व्हॉट्सऍपवर काय काय बोलतात माहितीये? वाचून तुम्हालाही येईल मजा