Saturday, June 29, 2024

युरोप फिरून ५ महिन्यानंतर मायदेशी परतली परिणीती चोप्रा; म्हणाली, ‘आपल्या घरासारखे…’

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटात आपली छाप सोडली आहे. त्याचबरोबर तिने अनेक सुपरहिट चित्रपट देखील केले आहेत. परंतु मागील काही दिवसांपासून ती सुट्टीचा आनंद घेत होती. गेल्या ५ महिन्यांपासून परिणीती भारताबाहेर होती. ती वेळोवेळी सोशल मीडियावर वेगवेगळ्या ठिकाणांहून फोटो आणि व्हिडिओ शेअर करत होती. त्याचबरोबर आता परिणीती भारतात परतली आहे. याबद्दलची माहिती तिने अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून दिली आहे.

परिणीतीने इंस्टावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ती तिच्या कारमध्ये मुंबईच्या रस्त्यावरून चालली आहे. ती तिच्या गाडीच्या खिडकीतून मुंबईची हवा घेताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शन लिहिले की, “५ महिन्यांनी घरी परतले. येथील हवेचा आनंद घेत आहे. आपल्या घरासारखे कोणतेच ठिकाण नाही.” (Actress Parineeti Chopra is back home enjoying the holidays, enjoying the air of Mumbai)

मागील काही दिवसांपासून परिणीतीने तिच्या प्रवासाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. परिणीती एकटी युरोपमध्ये प्रवासाचा आनंद घेत होती. त्यानंतर ती लंडनमध्ये फिरताना दिसून आली होती. परिणीती लंडनमध्ये तिची बहीण प्रियांका चोप्रासोबत वेळ घालवताना दिसून आली होती. या दोघी बहिणींनी त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर अनेक फोटो पोस्ट केले आहेत. विशेष म्हणजे परिणीतीने लंडनमध्येच कोरोना लसीचा डोसही घेतला होता.

शेवटची ‘सायना’ चित्रपटात दिसली
त्याचबरोबर परिणीती चोप्रा रुपेरी पडद्यावर शेवटची ‘सायना’ या चित्रपटाच्या वेळी दिसली होती. हा चित्रपट बॅडमिंटन स्टार सायना नेहवालच्या जीवनावर आधारित होता. त्यानंतर आता ती रणबीर कपूरच्या ‘ऍनिमल’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा आहेत. त्याचबरोबर अनिल कपूर, तृप्ती डिमरी आणि बॉबी देओल देखील या चित्रपटात दिसणार आहेत. परिणीतीचे चाहते ही तिला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. आता परिणीतीचा हा चित्रपट कधी येईल याची सर्वांना वाट पाहावी लागणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

स्टाईल आयकॉन बनत आहे सचिन पिळगावकरची लाडकी लेक; पाहा श्रियाचा हा ‘हटके’ अंदाज

-अभिनेत्री हंसिका मोटवानीने मालदीवमधून बिकिनी फोटो शेअर करत लावली सोशल मीडियावर आग

‘तू रंग है मेरा…’, म्हणत भाग्यश्री मोटेच्या लेटेस्ट फोटोने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

हे देखील वाचा