Tuesday, April 7, 2026
Home बॉलीवूड अद्भुत! परिणीती चोप्रा पाण्याखाली माशांसोबत करते मेडिटेशन, तिच्या अनोख्या मेडिटेशनच्या व्हिडिओ व्हायरल

अद्भुत! परिणीती चोप्रा पाण्याखाली माशांसोबत करते मेडिटेशन, तिच्या अनोख्या मेडिटेशनच्या व्हिडिओ व्हायरल

बॉलिूडमधील प्रत्येक कलाकार आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात आनंद आणि थोडी विश्रांती मिळावी म्हणून शांत आणि प्रसन्न ठिकाणी जाणे पसंत करतात. अशातच कोरोना महामारीनंतर अनेक कला कारांनी मालदीवचा दौरा सुरू केला होता. बॉलिवूडमधली आघाडीची अभिनेत्री असणारी परिणिती चोप्रा देखील आपल्या कुटुंबीयांसह मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे.

परिणीती चोप्राने सध्या आपल्या शूटिंगच्या कामातून सुट्टी घेतली असून, ती तिच्या कुटुंबीयांसह मालदीवला गेली आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या या ट्रिपचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती समुद्रात पोहताना दिसत आहे. निळेशार पाणी आणि त्यामध्ये आजूबाजूला दिसणारे भरपूर मासे, हे दृश्य डोळ्यांना शांत आणि मनाला प्रसन्न करणारं आहे. परिणितीने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “माझं मेडिटेशन”

प्रत्येकाच्या आयुष्यात मनशांती आणि ध्यान साधना खूप महत्वाची असते. सध्या परिणिती हे सर्व पाण्यातील रंगीबेरंगी माश्यांबरोबर करत आहे. परिणीतीने मालदीवमधील आणखीन एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती स्विमिंगपूलमध्ये पाण्यावर शांत तरंगताना दिसत असून, तिने यामध्ये पिवळ्या रंगाचा स्विमिंग सूट घातला आहे. तिच्या या सर्व व्हिडिओवर चाहत्यांनी हार्ट ईमोजीचा वर्षाव केला आहे. तसेच परिणिती यामध्ये खूप सुंदर आणि बोल्ड दिसत आहे. परिणीती मागील काही दिवसांपासून मालदीवमध्ये आहे. तिने तिच्या आई-वडिलांसोबत देखील फोटो पोस्ट केले होते.

परिणीतीच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास नुकतीच ती सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये झळकली होती. ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटामध्ये तिने तिच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. ‘हंसी तो फंसी’, ‘मेरी प्यारी बिंदु’, ‘गोलमाल अगेन’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने दमदार अभिनय केला आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने यशाचे शिखर गाठलेली परिणीती लवकरच ‘रिभू दासगुप्ता’मध्ये दिसणार आहे. तसेच सोशल मीडियावर देखील ती नेहमी सक्रिय असते. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व गोष्टींची माहिती चाहत्यांना वेळोवेळी देत असते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

बॉलिवूडचे ‘हे’ मोठे सिनेमे ठरले नुसताच फुसका बार, कमाईतून बजेट वसूल करणे देखील झाले मुश्किल

बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रींनी लग्नानंतर त्यांच्या यशस्वी चित्रपटांच्या करिअरला ठोकला रामराम

प्रायव्हेट जेटमध्ये मांडी घालून बसलेल्या प्रियांका चोप्राचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले, ‘खरी देसी गर्ल’

हे देखील वाचा