बॉलिवूडमध्ये सत्तर आणि ऐंशीचे दशक गाजवणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत. त्यामध्ये ‘जवानी जानेमन’, ‘रात बाकी बात बाकी’ या गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या अभिनेत्री परवीन बाबी यांचाही समावेश होतो. परवीन त्या काळातील सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांचे करिअर अतिशय जोमात असताना त्यांना भयंकर आजार झाला होता, त्यामुळे त्या बॉलिवूडपासून दूर गेल्या. त्यांचे निधन होण्याच्या कित्येक वर्षांआधीपासून त्या एकट्याच राहत होत्या. त्यांचे निधन अतिशय वाईट परिस्थितीत झाले होते.
अभिनेत्री परवीन बाबी (Parveen Babi) यांच्या निधनाविषयी त्यांच्या सोसायटीच्या सेक्रेटरीने पोलिसांना कळवले होते. त्यांनी पोलिसांना फोन करून सांगितले होते की, त्या दोन दिवस कोणालाच दिसल्या नव्हत्या. तसेच, त्यांच्या दरवाज्यात दूध आणि वर्तमानपत्र दोन दिवसांपासून तशीच पडलेली होती. त्यामुळे पोलिसांनी डुप्लिकेट चावीच्या मदतीने दरवाजा उघडला होता. त्यावेळी त्या मृत अवस्थेत आढळल्या होत्या. त्या घरात एकट्या राहत असल्याने त्यांचे निधन कधी झाले, हे कोणालाच कळले नव्हते. माध्यमांतील वृत्तांनुसार, 20 जानेवारी, 2005 रोजी त्यांचे निधन झाले होते. मात्र, त्यांचा मृतदेह 22 जानेवारी रोजी त्यांच्या फ्लॅटमधून काढण्यात आला होता.
हेही वाचा- भारताची पहिली ‘स्टंटगर्ल!’ ‘बसंती’ बनून धोकादायक सीन शूट करताना मरता-मरता वाचलेली रेशमा पठाण
अभिनेत्री आजूबाजूच्या लोकांशी देखील बोलत नसायच्या. परवीन बाबी यांचे निधन (Parveen Babi Death) सर्वांसाठी धक्कादायक होते. त्यांनी ‘दीवार’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘सुहाग’, ‘कालिया’, ‘नमक हलाल’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये परवीन बाबी यांनी मुख्य भूमिका साकारली होती.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘एकता कपूरच्या मालिकांनी टेलिव्हिजनची वाट लावली…’, दिग्गज अभिनेत्याची जोरदार टिका
चाळिशी पार करूनही एकटी जगतेय आयुष्य, साखरपुडा झाल्यानंतर सरकारी अधिकाऱ्याने दिलेला धोका