Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

गुड न्यूज! टेलिव्हिजनवरील ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री लवकरच होणार आई, सोशल मीडियावरून दिली माहिती

सध्या मनोरंजनविश्वात आनंदाचे वातावरण आहे. एकीकडे अनेक कलाकार विवाहबंधात अडकत असताना दुसरीकडे अनेक कपल आईबाबा झाले आहेत तर काही लवकरच होणार आहेत. आता या यादीमध्ये अभिनेत्री पूजा बॅनर्जीचे देखील नाव सामील झाले आहे. लोकप्रिय मालिका असणाऱ्या ‘कुमकुम भाग्य’मधील अभिनेत्री पूजा बॅनर्जी लवकरच आई होणार आहे. याबद्दल स्वतः पूजानेच माहिती दिली आहे. सध्या पूजाचा दुसरा महिना चालू असून ती मार्च २०२२मध्ये तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. पूजा आई होणार असल्याने तिचे संपूर्ण कुटुंबीय खूपच आनंदात आहे.

पूजाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा आणि तिच्या नवऱ्याचा एक फोटो शेअर करत ही गोड बातमी सर्वांना सांगितली आहे. या फोटोमध्ये पूजाने स्वीमसूट घातला असून, ती संदीपसोबत बेबी बंप दाखवताना दिसत आहे. या फोटोमध्ये दोघांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद स्पष्ट दिसत आहे.

पूजाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिच्या प्रेग्नन्सीबद्दल सांगितले आहे. ती म्हणाली की, “मी शुटिंगवरून निघत होते आणि मला जाणवले की काही ठीक नाहीये. त्यासाठी मी टेस्ट केली आणि जेव्हा मला रिपोर्ट मिळाले तेव्हा समजले की, मी प्रेग्नेंट आहे. मला खूपच आनंद झाला. मी लगेचच संदीपला फोन केला आणि त्याला सांगितले की, मला घ्यायला ये. कारण मला त्याला ही बातमी फोनवर दयायची नव्हती. आम्ही भेटल्यावर जेव्हा मी ही बातमी त्याला सांगितली तेव्हा तो अक्षरशः नाचायलाच लागला.”

पुढे पूजा म्हणाली, “आम्हाला दोघांनाही मुलीची खूप हौस आहे. मला तिला तयार करायचे आहे. मला आणि संदीपला २०२० मधेच बाळ पाहिजे होते. मात्र २०१९ मध्ये ‘नच बलिये’ शो दरम्यान माझ्यासोबत एक अपघात झाला आणि आम्ही हे पुढे ढकलले.” पूजा आता तिच्या ‘कुमकुम भाग्य’ शोमधून ब्रेक घेऊ इच्छिते. असेही तिला काही महिन्यांनी या शोमधून ब्रेक घ्यावा लागणार आहे. ती तिचा हा काळ पूर्णपणे एन्जॉय करायचा आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता! शाहरुख खानचा छोटा मुलगा अबरामला काजोलचा येतो खूप राग, पण का?

-‘या’ कारणावरून झाला होता शाहरुख अन् सलमानमध्ये वाद, कॅटच्या वाढदिवशी हाणामारीपर्यंत पोहचली गोष्ट

-Video: वाढदिवसाच्या पूर्वसंध्येपासूनच शाहरुख खानच्या घरी भेटवस्तू आणि पुष्पगुच्छांची रेलचेल सुरू

हे देखील वाचा