Wednesday, October 15, 2025
Home बॉलीवूड सायरस मिस्त्रींच्या निधनानंतर महेश भटांच्या लेकीची पोस्ट चर्चेत; म्हणाली, ‘कधी मिळणार शिक्षा?’

सायरस मिस्त्रींच्या निधनानंतर महेश भटांच्या लेकीची पोस्ट चर्चेत; म्हणाली, ‘कधी मिळणार शिक्षा?’

‘टाटा सन्स’चे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या कारचा अपघात झाला. अपघातादरम्यान सायरस यांनी सीट बेल्ट न लावल्याने त्यांचा व त्यांच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीचा मृत्य झाला. यावर अभिनेत्री पूजा भट्ट हिने ट्विटरच्या माध्यमातून कारच्या सीट बेल्ट लावण्यावर आणि रस्त्यावरील खड्ड्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाली पूजा?
पूजा भट्ट (Pooja Bhatt) हिने ट्वीट करत लिहिले की, “सीट बेल्ट- एयर बॅग या सर्व गाेष्टी महत्वाच्या? हा! पण खराब झालेली रस्ते आणि रस्त्यावरील खड्डे त्याचं काय. आमचे रस्ते, महामार्ग, फ्रीवे बांधण्यासाठी निकृष्ट दर्ज्याच्या सामग्रीचा वापर केव्हा गुन्हा मानला जाईल? तसेच एकदा बांधलेले रस्त्याचे धुमधडाक्यात उद्घाटन झाल्यानंतर त्या रस्त्यांची देखभाल करणे महत्त्वाचे आहे की नाही.”

सायरस यांच्या मृत्युनंतर, अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) हिने ट्विटरवर वाहन चालकांना सीट बेल्ट लावण्यासाठी विनंती केली हाेती. दियाने लिहिले होते की, “मी तुम्हाला सीट बेल्ट लावण्याची विंनती करते. आपल्या मुलांना सीट बेल्ट लावयाला शिकवा. यामुळे जीव वाचताे.”

तिच्या पाेस्टवर प्रतिक्रिया देत, एका व्यक्तीने लिहिले की, “विशेष करून तेव्हा जेव्हा प्रवासी सीटवर बसला असेल आणि याहून महत्वाचं जेव्हा कार हाईवे/एक्सप्रेसवर असेल.” एकाने ट्वीटरवर लिहिले, “अशाप्रकारे प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या आवाजाचा वापर सामाजिक जाणीव करण्यासाठी करावा.”

मागील आठवड्यात महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात कारने डिव्हायडरला धडक मारल्याने मागच्या सीटवर बसलेल्या सायरस यांचा मृत्यू झाला होता. यावर प्रतिक्रिया देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले होते की, “सरकार वाहन निर्मात्याला मागच्या साईडला देखील सीट बेल्ट अलार्म सिस्टम लावणं अनिवार्य करण्याची याेजना आखत करत आहे.”

सध्याच्या घडीला मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांनी सीट बेल्ट न घातल्यास केंद्रीय मोटार वाहन नियम (CMVR) यांच्या नियमानुसार कलम 138 (3) लावून 1 हजार रूपयाचा दंड लावण्यात येतो.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
दररोज पाहायचे एकमेकांचे तोंड, तरीही 3 महिने पतीशी बोलली नव्हती श्रीदेवी; कारण धक्कादायक
‘मी फक्त एवढंच सांगू शकते…’, राजूच्या तब्येतीबद्दल पत्नीने दिली महत्त्वाची अपडेट
‘या’ अभिनेत्रीने बिकिनी घालून ट्रेनरसोबत केला जबरदस्त योगा; नेटकरीही म्हणाले, ‘उद्या घटस्फोट फिक्स’

हे देखील वाचा