Thursday, October 16, 2025
Home मराठी ‘मी तुमचा जबराट फॅन झालोय’, मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतचे पक्षी प्रेम पाहून चाहतेही झाले खुश; पाहा गोड व्हिडिओ

‘मी तुमचा जबराट फॅन झालोय’, मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतचे पक्षी प्रेम पाहून चाहतेही झाले खुश; पाहा गोड व्हिडिओ

मराठी चित्रपटसृष्टीतील सुंदर आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. पूजा सावंतने चित्रपटसृष्टीमध्ये तिची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयाने आणि नृत्याने तिला पाहता क्षणीच सगळे तिच्या प्रेमात पडतात. तसेच पूजा सावंत सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. त्यामुळे तिची तगडी फॅन फॉलोविंग झाले आहे. तिचे इंस्टाग्रामवर 1.6 मिलियन एवढे फॉलोवर्स आहेत. तिचा कोणताही फोटो किंवा व्हिडिओ शेअर होता क्षणीच मोठ्या संख्येने लाईक केला जातो. या दिवसात पूजाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधून तिचे पक्ष्यांवरचे प्रेम स्पष्ट दिसत आहे.

पूजा सावंतने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिच्यासोबत एक छोटासा पक्षी आहे. तो पक्षी तिच्या अंगाखांद्यावर खेळताना दिसत आहे. तसेच पूजा देखील त्याला मायेने कुरवाळत आहे. ती त्याला पाणी पाजताना देखील दिसत आहे. या व्हिडिओमधून तिचे पक्षांवर‌ असलेले प्रेम व्यक्त होत आहे.

या पक्षाचे नाव budgie bird हे आहे. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’ चित्रपटातील ‘आय लव्ह यू’ हे गाणे वाजत आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “माझा छोटा पक्षी माझ्या आनंदात दररोज नव्याने भर पडतो, पिकाबू.”

पूजा सावंतचा हा व्हिडिओ सर्वांना खूप आवडला आहे. सगळेजण तिला कमेंट करत आहेत. तसेच तिच्याकडे असलेला पक्षी खूप क्यूट आहे असे म्हणत आहे. या व्हिडिओवर तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “पूजा मॅम मी तुमचा फॅन होतो पण आता तुमच्यातील प्राण्यांचा प्रती असलेले प्रेम बघून मी तुमचा जबराट फॅन झालोय. लव्ह यू मॅम.”

पूजाने यापूर्वीही प्राण्यांसोबतचे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत.

पूजा सावंतच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून 2010 मध्ये चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. या चित्रपटात तिने भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, सोनाली कुलकर्णी या कलाकारांसोबत काम केले होते. त्यांनतर तिने ‘दगडी चाळ’, ‘लपाछपी’, ‘झकास’, ‘नीलकंठ मास्टर’, ‘चिटर’, ‘वृंदावन’, ‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटात काम केले आहे. पूजा सावंत तिच्या डान्समुळे देखील खूप लोकप्रिय आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दगडाने संगीत वाजवत मुलाने ट्रेनमध्ये गायलं अरिजित सिंगचं गाणं; पाहा मन जिंकणारा व्हिडिओ

-चक्क बिकिनी घालून मंदिरा बेदीने केले चाहत्यांना घायाळ, व्हिडिओ शेअर करत सांगितले घरबसल्या ऑक्सिजन पातळी वाढवण्याचे गुपित

-खुशी कपूर झाली घराबाहेर स्पॉट अन् सगळीकडे होऊ लागली तिच्या वॉलपेपरची चर्चा, पाहून तुम्हीही व्हाल भावुक

हे देखील वाचा