Tuesday, July 9, 2024

अभिनेत्री प्राची देसाई करणार ‘या’ चित्रपटातून डिजिटल पदार्पण, मनोज तिवारीही मुख्य भूमिकेत

बॉलिवूडमधील अनेक कलाकार मंडळी डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले नशीब आजमावण्यासाठी त्यात पाऊल टाकताना दिसत आहेत. अशातच आता आणखी एक अभिनेत्री आपले डिजिटल पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. ती अभिनेत्री इतर कोणी नसून बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ‘प्राची देसाई’ ही आहे. प्राची खूप काळ चित्रपटांपासून दूर आहे. आता प्राची डिजिटल पदार्पण करणार असल्यामुळे तिच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. तिच्या या चित्रपटाचे पोस्टरही रिलीझ केला आहे.

प्राची ‘सायलेंस… कॅन यू हियर इट?’ या चित्रपटातून ओटीटी म्हणजेच डिजिटल पदार्पण करत आहे. हा चित्रपट झी५ वर येत्या २६ मार्च रोजी रिलीझ होणार आहे. या चित्रपटात प्राचीसोबत प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयीदेखील मुख्य भूमिकेत आहेत.

झी५ ने प्राचीचाही चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीझ केला आहे. प्राची या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे आणि मनोज वाजपेयी तिचे नेतृत्त्व करताना दिसणार आहेत. तिच्या चाहत्यांची या चित्रपटासाठीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

प्राचीने म्हटले की, “‘सायलेंस… कॅन यू हियर इट?’ या चित्रपटात ‘संजना’ नावाच्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. मी एसीपी अविनाशची भूमिका साकारणाऱ्या मनोज वाजपेयी यांच्या टीममध्ये करताना दिसणार आहे.”

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना प्राचीने सांगितले की, “‘संजना’ शांत आणि एकदम चपळ आहे, जिला प्रत्येक आव्हानाचा सामना कसा करायचा हे माहिती आहे. पहिल्यांदा पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत असल्यामुळे थोडी चिंता वाटत होती, परंतु एकूणच मला यातून शिकायला मिळाले आहे.”

या चित्रपटाची कहाणी रहस्यमयपणे गायब होणाऱ्या स्त्रीची आहे. आपले घर सोडण्याची तयारी करणारी महिला, अचानक गायब होते. त्यानंतर ट्रेकर्स तिचा मृतदेह शोधून काढतात.

या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अबन भरूचा देवहंस करत आहेत. या चित्रपटात मनोज वाजपेयी, प्राची देसाईयांच्यासोबतच अर्जुन माथुरही आहेत. यामध्ये साहिल, बरखा सिंग, साहिल वैद्य यांचादेखील समावेश आहे.

प्राचीबद्दल बोलायचं झालं, तर तिने एकता कपूरचा ‘कसम से’ या मालिकेतून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती. याव्यतिरिक्त तिने ‘रॉक ऑन’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. यानंतर तिने, ‘अझर’, ‘बोल बच्चन’, ‘पोलिसगिरी’, ‘तेरी मेरी कहाणी’ यांसारख्या चित्रपटात काम केले.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा

-जुळता- जुळता जुळतंय की! गंभीर आरोप केल्यानंतर आता नवाजुद्दीनच्या पत्नीला नकोय घटस्फोट? वाचा कारण

-आई श्रीदेवीने लेक जान्हवीच्या पहिला सिनेमा रिलीझ घेण्यापुर्वीच घेतली होती एक्झिट, असे भंगले होते जान्हवीचे स्वप्न

-‘अगदी अश्शा पद्धतीने करणार लग्न’, जान्हवी कपूरने लग्नाच्या पश्नावर दिलं हे उत्तर

हे देखील वाचा