Monday, June 23, 2025
Home मराठी मोहे रंग लगा दे रे…! म्हणत प्राजक्ताने वेधले सर्वांचे लक्ष, प्रत्येक फोटोत आहे काहीतरी खास बाब

मोहे रंग लगा दे रे…! म्हणत प्राजक्ताने वेधले सर्वांचे लक्ष, प्रत्येक फोटोत आहे काहीतरी खास बाब

प्राजक्ता माळी मराठी मनोरंजनविश्वातील सुंदर अभिनेत्री. तिने स्वतःला एक उत्कृष्ट अभिनेत्रीसोबतच एक उत्तम कवियत्री, उत्तम डान्सर, फिटनेस प्रेमी आहे. खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्व असलेली प्राजक्ता सतत या ना त्या कारणांमुळे मीडियामध्ये गाजताना दिसते. काही दिवसांपूर्वीच तिने तिचा स्वतःचा दागिन्यांचा ब्रँड लाँच केला. या ब्रँडचे नाव आहे ‘प्राजक्तराज.’ प्राजक्ताचे सतत लाइमलाईट्मधे राहण्याचे मुख्य कारण म्हणजे तिच्या सोशल मीडिया पोस्ट. प्राजक्ता माळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणाव सक्रिय असून ती सतत तिचे विविध वेशभूषेतील फोटो पोस्ट करत लोकांचे लक्ष वेधून घेत असते.

आता पुन्हा एकदा प्राजक्ताने तिच्या सुंदर लूकने नेटकऱ्यांना घायाळ केले आहे. प्राजक्ता नेहमीच तिच्या लूकवर विविध प्रयोग करताना दिसते. पारंपरिक, वेस्टर, इंडो वेस्टर्न आदी सर्वच लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसते. तिची स्टाइल देखील लोकांना खूपच आवडते. प्रत्येक लूक ती मोठ्या आत्मविश्वासाने कॅरी करते. आता होळीच्या निमित्ताने प्राजक्ताने तिचे काही अतिशय सुंदर आणि आकर्षक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा मॉडर्न अंदाज पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने गुलाबी रंगाचा स्कर्ट परिधान केला असून, त्यावर तीने रंगीबेरंगी डिपनेक आणि बलून टाईपचे स्लिव्ज असलेला टॉप परिधान केला आहे. या डिपनेक टॉपमध्ये ती खूपच कमाल दिसत आहे. या ड्रेससोबत तिने घातलेली ज्वेलरी देखील युनिक आहे. यावर तिने निळ्या रंगाचा नेकलेस परिधान केला असून, सोबतच या लुकला परफेक्ट करण्यासाठी प्राजक्ताने कानात गोल कानातले परिधान केलेले दिसत आहे. तर प्राजक्ताने तिचे सुंदर थोडे केस टाय केले असून, इतर केस व्हेवी स्वरुपात मोकळे सोडलेले दिसत आहे. यावर तिने अतिशय सिंपल मेकअप करून तिने तिचा लुक पूर्ण केला. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

प्राजक्ताने तिचे हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये ‘उजली कोरी प्रीत पिया, सतरंग लगा दे रे…। अंग लगा दे रे, मोहे रंग लगा दे रे…मैं तो तेरी जोगनिया, तू जोग लगा दे रे….।” या रामलीला सिनेमातील गाण्याच्या ओळी लिहिल्या आहेत. मालिका आणि चित्रपट या क्षेत्रात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवल्यानंतर आता प्राजक्ता माळी दागिन्यांच्या व्यवसायात सक्रिय झाली आहे. सध्या ती महाराष्टरची हास्यजत्रा या शोचे सूत्रसंचालन करतांना दिसत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
Womens Day Special: आधुनिक विचाराच्या क्षेत्रात राहूनही ‘या’ अभिनेत्री ठरल्या घरगुती हिंसाचाराच्या बळी

हे देखील वाचा