Monday, June 23, 2025
Home मराठी ‘प्राजू तुझं हसणं अन् माझं फसणं…’ प्राजक्ता माळीच्या लेटेस्ट फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

‘प्राजू तुझं हसणं अन् माझं फसणं…’ प्राजक्ता माळीच्या लेटेस्ट फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

उत्कृष्ट सूत्रसंचालिका, अभिनेत्री आणि आता उत्कृष्ट कवयित्री म्हणून लोकप्रिय असणारी मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी होय. अनेक मालिकांमध्ये, चित्रपटात काम केल्यानंतर प्राजक्ताचे अभिनय क्षेत्रात एक वेगळेच स्थान निर्माण झाले आहे. आलेल्या प्रत्येक भूमिकेला तिने न्याय दिला आहे. म्हणूनच ती चाहत्यावर्गात सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या देखण्या आणि सोज्वळ रूपाचे दर्शन ती तिच्या चाहत्यांना वारंवार देत असते. सध्या नवरात्र उत्सव चालू आहे. या निमित्त अनेक महिला दररोज देवीच्या रंगानुसार कपडे परिधान करून सोशल मीडिया फोटो शेअर करत असतात. अशातच प्राजक्ताने देखील पांढऱ्या रंगाच्या पोशाखातील तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

प्राजक्ताने इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने पांढऱ्या रंगाचा एक सुंदर लाँग ड्रेस घातला आहे. या ड्रेसवर तिने ऑक्साइड ज्वेलरी घातली आहे. तसेच कानात मोठे‌‌ ईअरिंग आणि बोटात अंगठी घातलेली दिसत आहे. या फोटोमध्ये ती वेग-वेगळ्या पोझ देताना दिसत आहेत. (Actress Prajakta mali share her photo on social media)

हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “स्वच्छंदी रंग.” तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे अनेकजण या फोटोवर कमेंट करत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “पृथ्वीवरील खरी अप्सरा.” तर आणखी एकाने. लिहिले आहे की, “प्राजू तुझं हसणं आणि माझं फसणं दोन्ही एकाच वेळी घडलं, नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.” यासोबत इतर अनेकजण या फोटोवर कमेंट करत आहेत.

प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या लोकप्रिय मालिकेमध्ये काम केले आहे. या मालिकेमधून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. या मालिकेतील तिच्या साध्या, भोळ्या आणि सालस स्वभावाने सगळ्यांच्या मनावर राज्य केले. तसेच तिने ‘खो-खो’ या चित्रपटात काम केले आहे. ती सध्या ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या विनोदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे ‘प्राजक्तप्रभा’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

नादच खुळा! अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या बॉडीगार्डला मिळतो ‘इतका’ पगार; आकडा तर वाचा…

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे

हे देखील वाचा