सोशल मीडिया हे असे माध्यम आहे, जिथे तुम्ही काहीही शेअर करा, ते व्हायरल होण्यास जास्त वेळ लागत नाही. यावर सर्वाधिक कोणती गोष्ट व्हायरल होत असेल, तर ते म्हणजे मीम्स. नेटकरी कलाकारांवर मीम्स बनवतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात, हे तर आपल्याला माहितीच आहे. मात्र, जर एखाद्या कलाकारानेच त्याच्यावर बनवलेले मीम्स शेअर केले तर…? होय, मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने तिच्यावर बनवलेले भन्नाट मीम्स शेअर केले आहेत. हे मीम्स शेअर करत तिने लक्षवेधी कॅप्शनही दिले आहे.
प्राजक्ताने स्वत: शेअर केली मीम्सची पोस्ट
अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हे मीम्स शेअर (Prajakta Mali Memes) केले आहेत. तिने ही पोस्ट शेअर करताना सुंदर कॅप्शन दिले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “खूप काळानंतर मीम्सच्या दुनियेत. मी एकटीच का? तुम्हीही आनंद घ्या!”
View this post on Instagram
नेमके काय आहेत मीम्स?
प्राजक्ताने शेअर केलेल्या पोस्टमध्ये १० मीम्सचे फोटो आहेत. यामध्ये सिनेमातील डायलॉग, पोस्टर यांसारख्या अनेक गोष्टींवरून मीम्स तयार केले गेले आहेत. यातील काही मीम्स हे प्राजक्ताच्या फॅन पेजने तयार केलेले आहेत. यातील पहिल्या पोस्टबद्दल बोलायचं झालं, तर यामध्ये प्राजक्ताचे दोन फोटो घेतले गेले आहेत. यातील एक फोटो प्राजक्ताने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या लेटेस्ट फोटोपैकी एक आहे. तसेच, दुसऱ्या फोटोत ती औक्षणाचं ताट घेऊन दिसत आहे. यातील पहिल्या फोटोसमोर लिहिले आहे की, “पुण्यात असताना ती.” तसेच, दुसऱ्या फोटोत लिहिले आहे की, “गावाकडे आल्यावर ती.” प्राजक्ताने शेअर केलेल्या या मीम्सला चाहत्यांकडून जोरदार पसंती मिळत आहे.
चाहत्यांच्या प्रतिक्रिया
तिच्या या पोस्टला अवघ्या २ तासांमध्येच १६ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले. विशेष म्हणजे, शेकडो चाहत्यांनी कमेंट्सद्वारे तिच्या पोस्टवर हसणाऱ्या इमोजींचा पाऊस पाडला आहे. एका चाहत्याने कमेंट करून लिहिले आहे की, “आता सगळ्यांना कळलं की, फरसाणाला प्राजक्तापासून कोणी वाचवू शकत नाही.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “सगळीकडे तुझंच साम्राज्य. खूप आवडले सर्व मीम्स.” आणखी एकाने लिहिले की, “एकच हृदय आहे कितीदा जिंकणार!” या मीम्समधील प्राजक्ताचे फरसाणवरील मीम पाहून एक चाहता म्हणाला की, “मग मिसळमधले फक्त फरसाणच खात असाल तुम्ही.”
प्राजक्ताचे सिनेमे आणि मालिका
प्राजक्ताच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर तिने ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ या मालिकेत ती झळकली आहे. याव्यतिरिक्त ती ‘खो-खो’, ‘हंपी’, ‘रणांगण’, ‘पावनखिंड’, ‘लॉकडाऊन’, ‘चंद्रमुखी’ आणि काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘रानबाजार’ या वेबसीरिजमध्येही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अरेरे! लतिकाला मिळेना लग्नासाठी मुलगा, अभिनेत्री अक्षया नाईकने थेट सोशल मीडियावरुन व्यक्त केली खंत
अरेरे! गाढ झोपी गेलेल्या मितालीसोबत ‘हे’ काय करतोय सिध्दार्थ चांदेकर, व्हिडिओ होतोय व्हायरल
‘डेढ फुटिया’ भूमिका गाजवणाऱ्या नार्वेकरांचे साठीत पदार्पण, बॉलिवूडमध्येही सोडली अभिनयाची छाप