आज काल सोशल मीडिया हा प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचा विषय ठरला आहे. प्रत्येकजण आपल्या भावना आपल्या आयुष्यातील सुख-दुःख, यश-अपयश आयुष्यातल्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतात. चित्रपटातील अनेक कलाकारांपासून तर सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येकजण सोशल मीडियाचा वापर करत असतो. आता सोशल मीडिया एक देवाण घेवाणीचे माध्यम झाले आहे. अनेक कलाकारांची ओळख तर सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असते. ते नेहमीच त्यांचे वेगवेगळे व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर शेअर करून सगळ्या प्रेक्षकांची जोडून राहण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री प्राजक्ता माळीचा सोशल मीडियावरील वावर वाढताना दिसत आहे. नुकताच साजशृंगार करून प्राजक्ता माळीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.
अभिनेते प्राजक्ता माळीने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पाहू शकता कि, भरजरी पैठणीमध्ये प्राजक्ता माळीचे सौंदर्य खुलले आहे.आणि ती खूपच सुंदर दिसत आहे. व्हिडिओमध्ये तीने पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची साडी घातली आहे. आणि या साडीला हिरव्या रंगाची बॉर्डर आहे, तसेच तिने हिरव्या रंगाचा डिझायनर ब्लाऊज देखील घातला आहे. या साडीवर तिने तिच्या केसांची छानशी वेणी घातलेली आहे. तसेच कपाळावर टिकली देखील लावली आहे. तिचं हे मराठमोळं आणि मनमोहक सौंदर्य सगळ्यांना तिच्या प्रेमात पाडत आहे.
प्राजक्ता माळीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तीने ‘गं साजणी’ या मराठी गाण्यावर तिच्या साडीतला अंदाज दाखवला आहे. ती या साडीमध्ये खूपच खुलून दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आणि प्रत्येक मराठी मनावर ताबा मिळवत आहे. अनेक प्रेक्षकांनी तसेच तिच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोवर अनेक कमेंट्स करून तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. तसेच या व्हिडिओला खूप कमी वेळात पन्नास हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहे.
प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या लोकप्रिय मालिकेमध्ये काम केले आहे. या मालिकेमधून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. या मालिकेतील साध्याभोळ्या आणि सालस स्वभावाने सगळ्यांच्या मनावर राज्य केले. ती सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा या विनोदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे.










