अभिनेत्री प्रिया बापटने चित्रपटसृष्टीत अगदी कमी कालावधीत स्वतःची विशेष ओळख निर्माण केली आहे. आज तिचे लाखो चाहते आहेत. छोट्या भूमिका करण्यापासून ते मुख्य अभिनेत्रीचे पात्र साकारण्यापर्यंत, प्रियाने खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळेच आज तिला प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली आहे. ही सुंदर अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय राहून बऱ्याचदा तिचे फोटो शेअर करत असते. अशातच तिच्या साडीमधील स्टायलिश लूक समोर आला आहे.
प्रियाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्रियाने हिरव्या रंगाची पैठणी घातली आहे. यावर तिने सोनेरी रंगाचा ब्लाऊज घातला आहे. कानात मोठे झुमके घातले आहेत. तसेच कपाळी टिकली लावली आहे. तिने मिडल पार्टेशन करून केस मागे बांधले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने बॅकलेस ब्लाऊज घातला आहे. फोटोमध्ये तिचा पारंपारिक आणि मॉर्डन लूक दिसत आहे. (actress priya bapat share her stylish saree photo on social media)
प्रियाने शेअर केलेला हा फोटो तिच्या चाहत्यांना तर आवडलाच आहे, पण अनेक कलाकार देखील तिच्या या फोटोवर अनेक कलाकार प्रतिक्रिया देत आहेत. या फोटोवर अभिनेत्री अमृता खानविलकर हिने “अय सेक्सी,” अशी कमेंट केली आहे. तसेच आदिनाथ कोठारे याने हार्ट इमोजी पोस्ट केली आहे. सोनाली खरे हिने “वाव,” अशी कमेंट केली आहे. तसेच तिच्या एका चाहत्याने “बापरे कडक,” अशी कमेंट केली आहे. तिचा हा फोटो सर्वांना खूप आवडला आहे.
अभिनेत्री प्रिया बापटने नाटक, मालिका आणि त्यानंतर चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तिने ‘वजनदार’, ‘टाईमपास २’, ‘लोकमान्य: एक युगपुरूष’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘टाईम प्लिज’, ‘काकस्पर्श’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ यांसारख्या चित्रपटात अभिनय करून लाखो चाहत्यांच्या मनात घर केले आहे.
याशिवाय प्रिया संजय दत्तसोबत ‘लगे रहो मुन्नाभाई’ आणि ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या हिंदी चित्रपटातही दिसली आहे. तसेच तिने ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेबसीरिजमध्ये काम केले आहे. या वेबसीरिजचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. या वेबसीरिजला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. तसेच तिची आणि तिचा पती उमेश कामत यांची ‘आणि काय हवं’ ही वेबसीरिज देखील प्रदर्शित झाली आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘माझ्या सर्वस्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा’, म्हणत सिद्धार्थने पत्नी मितालीला केले विश
-आहा…किती ते देखणं रूप! प्रार्थना बेहेरेचे सुंदर फोटो पाहून चाहत्यांच्या बत्त्या गुल
-काळजाचा ठोका चुकवणारी बातमी! चिरंजीवीचा भाचा अन् अभिनेता साई धरम तेजचा अपघात; आता कशीय तब्येत?