Wednesday, June 26, 2024

‘तमाशा चवीने बघणारे लोकं आहेत तोपर्यंत…’ गौतमी पाटील आणि तिच्या लावणी कार्यक्रमावर प्रिया बेर्डेचे परखड मत

डान्सर गौतमी पाटील हा विषय मागील बऱ्याच काळापासून तुफान गाजत आहे. गौतमीवर अनेक आरोप प्रत्यारोप होत आहे. तर दुसरीकडे तिचे कौतुक करणारे तिला पाठिंबा देणारे लोकं देखील समोर येत आहे. गौतमी पाटील जरी स्वतःला लावणी नृत्यांगना म्हणत असली तरी तिला बहुतकरून लोकांनी फक्त डान्सर असेच नाव दिले आहे.

रोज नवीन कार्यक्रम, प्रत्येक कार्यक्रमात काहीतरी घडते आणि गौतमीवर टीका होते. आजवर अनेकांनी तिच्यावर टीकास्त्र ओढले असले तरी तरी तिने मात्र तिचे डान्स शो करणे काही बंद केले नाही. आता या सर्व गोष्टींवर आणि गौतमीवर मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाबाबत आणि तिच्याबाबत प्रिया बेर्डे म्हणाल्या, “या सगळ्या गोष्टींना बघणारे लोकंच जबाबदार आहेत. अशा प्रकारची गाणी, तमाशा चवीने बघणारे लोकं आहेत तोपर्यंत या गोष्टी बंद तरी कशा होणार? आम्ही कलाकारांनी किंवा सरकारने कितीही सांगितले निषेध केला तरी काही उपयोग नाही. आम्ही फक्त बोलायचा अवकाश की आम्हाला लगेच ट्रोल केले जाते. पण म्हणून आम्ही बोलणे थांबवणार नाही. लोकं जोपर्यंत असे कार्यक्रम पाहणं बंद करत नाहीत तोपर्यंत हे सुरुच राहणार”

तत्पूर्वी ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी गौतमीच्या डान्स शोजसाठी होणाऱ्या गर्दीवर टीका करत खंत व्यक्त केली होती. दरम्यान अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला आहे. नाशिक येथे भाजप नेते चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रिया बेर्डे यांनी भाजपात प्रवेश केला.

गौतमीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिची लावणी संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे ‘तेरा पता’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असून, लवकरच ती ‘घुंगरू’ या मराठी चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अण्णांचा हटके अंदाज! नागराज मंजुळने वाजवली हलगी अन् आकाश-सायलीने केला भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल

आपल्या विवादित आणि मुक्त वक्तव्यांमुळे सतत चर्चित असणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखले का?

हे देखील वाचा