ऑक्टोबर महिना चालू झाला की, सगळ्या झी मराठी प्रेमींना एकाच गोष्टीची ओढ लागते, ती म्हणजे झी मराठी पुरस्कार सोहळा. झी मराठीचे संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन हा उत्सव आनंदाने साजरा करत असतात. या वर्षी देखील हा उत्सव पार पडणार आहे. मागील बरेच दिवसापासून टेलिव्हिजनवर तसेच सोशल मीडियावर हा सोहळा लवकरच भेटायला येणार आहे, या गोष्टी समोर येत होत्या. अशातच अभिनेत्री प्रिया मराठे हिने पुरस्कार सोहळ्यातील डान्स प्रॅक्टिसचा एक व्हिडिओ शेअर करून एक झलक दाखवली आहे.
प्रियाने इंस्टाग्राम स्टोरीला एक बुमरँग व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या डान्सची झलक पाहायला मिळत आहे. तिने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती मालिकेतील मालविका आणि रॉकी दिसत आहे. (Actress priya marathe share video of dance on Instagram story)
झी मराठी पुरस्कार सोहळा हा १६ ऑक्टोबरला शूट केला जाणार आहे. हा कार्यक्रम सारेगामापा हिंदीच्या सेटवर चित्रीत केला जाणार आहे. हा सोहळा शनिवारी (३० ऑक्टोबर) रोजी टेलिव्हिजनवर दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षक हा सोहळा बघण्यासाठी खूप उत्सुक आहेत. या सोहळ्यात कोणाकोणाला पुरस्कार मिळणार आहेत. तसेच या वर्षी झी मराठीवरील कलाकार काय कमाल करणार आहेत, हे बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.
प्रिया सध्या झी मराठीवरील ‘येऊ कशी मी नांदायला’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत अलीकडेच तिची एन्ट्री झाली आहे. त्यानंतर मालिकेत एक वेगळे वळण आले आहे. स्वीटूचे लग्न ओमशी होण्याऐवजी मोहितशी झाल्यामुळे प्रेक्षकांनी या मालिकेवर खूप संताप व्यक्त केला होता. परंतु प्रियाच्या एन्ट्रीने मालिकेत रंगत आली आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सोनाली कुलकर्णीचा ‘शटर’ चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर
-तेजश्री प्रधान करणार ‘या’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण, लवकरच होणार सिनेमा प्रदर्शित