बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राकडे (Priyanka Chopra) पाहिले जाते. प्रियांका आणि निक जोनास (Nick Jonas) हे रोमँटिक जोडप्यांपैकी एक असून, ते नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्याबद्दल नेहमीच काही ना काही माहिती जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. हे जोडपे देखील त्यांच्या चाहत्यांबरोबर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. दोघांनीही आपले प्रेम केवळ सातासमुद्रापार नेलेच नाही, तर आज ते छान वैवाहिक जीवन जगत आहेत. वयाचे अंतर असो की, दोन देशांमधील अंतर, ते दोघांमध्ये येऊ शकले नाही. दोघेही आज परिपूर्ण जोडप्यासारखे आयुष्य जगत आहेत. परंतु अनेक लोक इतके आनंदी नसतात. त्यांनी त्यांच्यातील एक विशेष बंध कायम ठेवला आहे, जो प्रत्येक जोडप्याने परिपूर्ण जोडपे बनण्यासाठी केला पाहिजे.
प्रियांका चोप्राने मान्य केले, लग्नानंतर आयुष्यात झाले अनेक बदल
प्रियांकाने स्वतः अनेक मुलाखतींमध्ये मान्य केले आहे की, निक जोनासशी लग्न केल्यानंतर तिच्यात अनेक सकारात्मक बदल झाले आहेत. ती निकसोबत खूप खूश आहे. जोडप्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, लग्न झाल्यावर आयुष्य पूर्णपणे बदलते आणि हा बदल आनंदाने स्वीकारला तर गोष्ट बनते.
प्रियांका चोप्रा स्वतःला म्हणाली, गरम मिरची
प्रियांकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, निक जितका शांत आहे, तितकीच ती तिखट आहे. लग्नानंतर तिच्यात बरेच बदल झाल्याचे तिने मान्य केले असले, तरी जेव्हा-जेव्हा तिला राग येतो, तेव्हा निक शांत राहतो आणि त्यांची भांडणे आपोआप संपतात. जोडप्यांसाठी प्रियांकाचा हा एक मोठा संदेश आहे की, कोणत्याही नात्यात एकजण जास्त चिडला, तर दुसऱ्याने स्वतःहून शांत व्हावे. यावरून तुमचे भांडण कधी संपेल हे कळणारही नाही.
जोडीदाराची साथ मिळाल्यास करिअरची बदलते दिशा
हे अगदी खरे आहे की, जर तुमचा जोडीदार तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला साथ देत असेल, तर तुमच्या करिअरची संपूर्ण दिशाच बदलून जाते. तुम्ही अधिक लक्ष केंद्रित करता आणि तुमच्या करिअरसाठी आणखी कठोर परिश्रम करता. कारण, तुमच्या पाठीशी कोणीतरी आहे हे तुम्हाला जाणवते. जोडीदाराच्या पाठिंब्याचा करिअरवर लक्षणीय परिणाम होतो. कोणतेही नाते यशस्वी होण्याचे कारण म्हणजे तुम्ही दोघे एकमेकांना समजून घेता आणि चांगल्या-वाईट काळात एकमेकांच्या पाठीशी उभे राहता, असेही तिने सांगितले होते.
प्रियांका अलीकडेच निक जोनाससोबत घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आली होती. तिने तिच्या सोशल मीडिया हँडलवरून जोनास हे नाव काढून टाकले होते, त्यानंतर अशी अफवा पसरली की, प्रियांका निकपासून घटस्फोट घेत आहे. मात्र, काही काळानंतर तिने हे वृत्त चुकीचे असल्याचे सांगितले. तसेच प्रियांका आणि निक एकमेकांसोबत बराच वेळ घालवताना आणि प्रेम व्यक्त करताना दिसत असतात.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जुही चावलाने सांगितले केकेआर सामना हरल्यानंतर काय करतो शाहरुख खान