अभिनेत्री प्रियांका चोप्रा बॉलिवूडमधील अशी एक अभिनेत्री आहे जिने हॉलिवूडमध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. आज ती देश-विदेशात मोठे नाव बनली आहे. प्रियांका आता बॉलिवूड चित्रपटांमध्ये क्वचितच दिसत असली, तरीही हॉलिवूडमध्ये चांगलीच गाजत आहे. ती परदेशात स्थायिक झाली आहे, पण तरीही ती तिचे संस्कार विसरलेली नाहीये. ती भारतातील प्रत्येक सण जसा ती भारतात राहून साजरा करत होती, त्याच पद्धतीने ती परदेशातही साजरे करते. याचाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला प्रियांकाचा ( Priyanka Chopra) अभिमान वाटेल. या व्हिडिओमध्ये प्रियांका तिच्या शेफसोबत आरती करताना दिसत आहे, तर त्याचवेळी निक जोनास (Nick Jonas) देखील भक्तीमध्ये मग्न झालेला दिसत आहे. हा व्हिडिओ आजचा नसून, गेल्या दिवाळीचा आहे. प्रियांकाच्या फॅन क्लबने हा व्हिडिओ शेअर केला असून, प्रियांकाचा हा व्हिडिओ पाहून भारतातील तिच्या चाहत्यांना तिचा खूप अभिमान वाटत आहे. परदेशातही आपल्या देशाची संस्कृती कशी जपायची हे प्रियांकाला चांगलेच ठाऊक आहे.
प्रियांकाचा हा व्हिडिओ पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहे आणि त्यावर सतत कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले की, “निक आणि प्रियांका दोघांना खूप प्रेम आणि आदर, त्यांनी नेहमीच त्यांच्या मित्र आणि कर्मचाऱ्यांना कुटुंबासारखे वागवले. देव दोघांनाही खूप प्रेम आणि आनंद देवो.”
प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्रामवर दिवाळी पूजेचे अनेक फोटो शेअर केले होते. पूजेमध्ये दोघेही एथनिक लूकमध्ये दिसले. प्रियांकाने निक जोनासला तिच्या रंगात रंगून टाकले आहे. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली असून, आता हा व्हिडिओ पाहून त्यांचे चाहते त्यांचे कौतुक करताना थकत नाहीत.
हेही नक्की वाचा-
- ओहह! करीना आणि रिया व्हॉट्सऍपवर काय काय बोलतात माहितीये? वाचून तुम्हालाही येईल मजा
- करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी गाडीत बसल्या बसल्या केली ‘ही’ चूक, सोशल मीडियावर केले जाते ट्रोल
- शाहरुख खानची लाडकी लेक ग्लॅमरस पोझ देत म्हटली ‘असे’ काही, कमेंट्सचा आला पूर!
हेही पाहा-