Friday, August 8, 2025
Home बॉलीवूड नव्या घरात प्रियांका अन् निकने साजरी केली पहिलीच दिवाळी, ‘या’ हॉलिवूड गायकाने लावली उपस्थिती

नव्या घरात प्रियांका अन् निकने साजरी केली पहिलीच दिवाळी, ‘या’ हॉलिवूड गायकाने लावली उपस्थिती

ग्लोबल अभिनेत्री प्रियांका चोप्रा जरी विदेशात राहत असली तरीही भारतातील सण-उत्सव, संस्कार ती विसरली नाही. ‘देसी गर्ल’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रियांका चोप्राने तिच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली आहे. प्रियांका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ तो सातत्याने सोशल मीडियावर शेअर करत असते. प्रियांका आणि तिचा पती निक यांनी नवीन घर खरेदी केले आहे. तिथेच त्यांनी त्यांची ही दिवाळी साजरी केली आहे.

या दिवाळीमध्ये तिने एक डिझायनर लेहंगा घालून फोटोशूट केले आहे. तसेच केसांमध्ये पांढऱ्या रंगाची फुले माळली आहेत, तर निकने लाल रंगाचा प्रिंटेड कुर्ता आणि पायजामा घातला आहे. प्रियांका चोप्राने तिच्या नवीन घराला दिवाळीत पणत्या, फुले आणि रांगोळीने सजवले आहे.

हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “आमच्या नवीन घरातसोबत आमची पहिली दिवाळी. हे नेहमीच आमच्यासाठी खास असणार आहे. ही संध्याकाळ सुंदर बनवण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली आहे त्यांना सगळ्यांना धन्यवाद.” (Actress Priyanka Chopra and nik Jonas celebrate their first diwali in new house)

यासोबत तिने पुढे लिहिले आहे की, “त्या सगळ्या लोकांसाठी ज्यांनी आमचे घर आणि संस्कृतीला केवळ चांगला ड्रेस घालून नाही तर डान्स करून आनंदाने सन्मानित केले. तुम्ही मला अशी फिलिंग दिली आहे जशी काय माझ्याच घरी मी परत आले आहे. सगळ्यात खास म्हणजे माझा पती आणि माझा साथी मी तुझ्यावर खूप प्रेम करते. माझे मन आभारी आहे. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.” यावेळी हॉलिवूडमधील लोकप्रिय गायक जॉन लिजेंड आणि त्याची पत्नी देखील आली होती.

या आधी प्रियांकाने त्यांच्या नवीन घराची पूजा करताना फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये प्रियांका आणि निक पारंपरिक अंदाजात दिसत होते. प्रियांकाने पिवळ्या रंगाची साधी साडी नेसली होती, तर निकने कुर्ता घातला होता. यात प्रियांका सगळे भारतीय रीतीरिवाज करताना दिसत होती. तिने पूजा चालू असताना डोक्यावर पदर घेतला होता तसेच गळ्यात मंगळसूत्र देखील घातले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिल्व्हर रंगाच्या शिमरी गाऊनमधे करिश्मा कपूरचा घायाळ करणारा अंदाज पाहिला का?

-‘दिल तो पागल है’ला २४ वर्षे पुर्ण: कोणाचीही हिंमत नसताना, माधुरीला टक्कर देण्यास तयार झाली होती करिश्मा

-करीनाचा चिमुकला जेह दिसला आत्या सबाच्या मांडीवर खेळताना; पाहा ‘हा’ गोंडस फोटो

हे देखील वाचा