बॉलिवूडच नाही, तर हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये अव्वलस्थानी नाव येते, ते प्रियांका चोप्रा हिचे. प्रियांकाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. प्रियांकाची जाऊबाई आणि हॉलिवूड अभिनेत्री सोफी टर्नर हिने वयाच्या २६व्या वर्षी दुसऱ्या अपत्याला जन्म दिला आहे. सोफी आणि जो जोनास हे दुसऱ्यांदा आई-वडील बनले आहेत. सोफीच्या घरी दुसऱ्यांदाही चिमुकलीचेच आगमन झाले आहे. यामुळे तिच्या चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.
सोफी आणि जो जोनासचे लग्न
अभिनेत्री सोफी टर्नर (Sophie Turner) आणि तिचा पती जो जोनास (Joe Jonas) हे दोघेही त्यांचे वैयक्तिक आयुष्य सोशल मीडिया आणि लाईमलाईटपासून दूर ठेवणे पसंत करतात. कधीकधी हे जोडपे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत फोटोही सोशल मीडियावर शेअर करतात. मात्र, तरीही ही जोडी चाहत्यांमध्ये खास प्रसिद्ध आहे.
View this post on Instagram
डेटिंगनंतर थाटला संसार
सोफी आणि जो जोनास या जोडप्याने ०१ मे, २०१९ रोजी लग्नगाठ (Sophie Turner And Joe Jonas Marriage) बांधली होती. सोफी आणि जो हे लग्नाआधी ३ वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर दोन महिन्यांनी फ्रान्समध्ये पुन्हा रीतिरिवाजाने लग्नगाठ बांधली होती.
View this post on Instagram
सोफीबद्दल बोलायचं झालं, तर ती हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिला ‘गेम ऑफ थ्रोन्स’ (Game of Thrones) या शोसाठी ओळखले जाते. ५९ एपिसोड असणाऱ्या या शोमध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती. ‘गेम्स ऑफ थ्रोन्स’ व्यतिरिक्त तिने ‘अनादर मी’, ‘एक्स-मेन: एपोकेलिप्स’, ‘जोसी’, ‘टाइन फ्रीक’, ‘डार्क फिनिक्स’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे. तिने टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे.
सध्या ती ‘द स्टेअरकेस’मध्ये मुख्य भूमिकेत काम करत आहे. सोफीबद्दल खास बाब अशी की, तिला ‘गेम्स ऑफ थ्रोन्स’साठी ८ वेळा नॉमिनेशन मिळाले होते. यामध्ये ती ३ वेळा पुरस्काराची मानकरी ठरली आहे. इतकेच नाही, तर तिला सन २०१६ साली सर्वोत्तम ग्लोबल अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खेसारीने गांजा पिऊन चालवली गाडी, शेजारी बसलेल्या अभिनेत्रीचाही उडाला थरकाप, व्हिडिओला ६ कोटी व्ह्यूज
‘तो फक्त ऍडल्ट फिल्मचा हिरो’, रणबीरबद्दलच्या प्रश्नावर नोराचे खळबळजनक विधान