Wednesday, July 3, 2024

‘तुम्ही भारताला कोरोना लसीचा पुरवठा करू शकता का?’ भारताची वाईट परिस्थिती पाहून प्रियांका चोप्राचे अमेरिकेच्या राष्ट्रपतींना ट्वीट

संपूर्ण भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसत आहे. वैद्यकीय सुविधांचा तुटवडा पडत आहे. रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा हा विषाणू खूप वेगाने संक्रमित होताना दिसत आहे. भारतातील कोरोनाचा हाहाकार बघून अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने दुःख व्यक्त केले आहे.

प्रियांका चोप्राने ट्वीट करून तिचे दुःख व्यक्त केले आहे. या ट्विटला तिने अमेरिकेच्या राष्ट्रपतींना टॅग केले आहे. तिने त्यांना कोव्हिड- १९ ची लस भारताला देण्यास सांगितले आहे. तसेच मदत करण्याचा आग्रह केला आहे. भारताने काही दिवसांपूर्वी कोरोनाची लस लाँच केली आहे आणि ४५ वर्षांच्या पुढील सर्व नागरिकांना लस देणे चालू केले आहे. परंतु या दुसऱ्या लाटेच्या वेगाने होणाऱ्या संक्रमणामुळे काही राज्यांना लस पोहोचत नाहीये.

प्रियांका चोप्राने ट्वीट करून लिहिले आहे की, “मला खूप दुःख होत आहे की, भारत हा देश कोरोनाने पीडित आहे. अमेरिकेने 550M अतिरिक्त लसींची ऑर्डर दिली आहे. या लसीचे सगळीकडे वाटप केल्याबद्दल धन्यवाद. परंतु सध्या माझ्या देशाची परिस्थिती खूप गंभीर आहे. तुम्ही या लसीचा भारताला पुरवठा करू शकता का?” यात तिने अमेरिकेच्या राष्ट्रपतींनाही टॅग केले आहे.

प्रियांका चोप्रा ही सध्या भारतात राहत नाहीये. पण भारतातील या संकटासाठी ती अनेक गोष्टींची देवाण- घेवाण करताना दिसते. ती कुठेही असली, तरीही भारताशी नेहमी जोडून असते. सध्या ती भारताला या संकटातून वाचवण्यासाठी समाजिक पातळीवर प्रयत्न करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आनंदाची बातमी! कॉमेडियन सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले अडकले लग्नबंधनात, साध्या पद्धतीने पार पडला लग्नसोहळा

-महिलेकडे स्तनपान करतानाचा व्हिडिओ मागणाऱ्या व्यक्तीला अभिनेत्री नेहा धुपियाची चपराक; फोटो शेअर करत दिले सडेतोड प्रत्युत्तर

-अंकिताच्या बॅकलेस गाऊनमधील हॉट आणि बोल्ड लूकने चाहते घायाळ, सोशल मीडियावर फोटोंचा धुुमाकूळ

हे देखील वाचा