Wednesday, July 3, 2024

मायलेकीचा निराळा अंदाज! प्रियांकाने केले आईसोबतचा स्टायलिश फोटो शेअर; शॉर्ट्स अन् टॉपमध्ये दिसल्या मधू चोप्रा

हिंदी चित्रपटसृष्टीत अशा मोजक्याच अभिनेत्री असतील, ज्यांनी केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. या अभिनेत्रींमध्ये समावेश होतो, तो म्हणजे ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राचा. प्रियांका बॉलिवूडनंतर आता हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडत आहे. अभिनयाव्यतिरिक्त ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती फोटो, व्हिडिओ शेअर करून तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अपडेट देत असते. अशातच आता तिने पुन्हा एकदा फोटो शेअर केले आहेत. त्यात ती आपली आई मधू चोप्रासोबत दिसत आहे. (Actress Priyanka Chopra Spent Good Time At Rock And Roll Hall of Fame With Mother Madhu Chopra Shares Photos)

प्रियांकाने मंगळवारी (२९ जून) अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर आऊटिंगचे स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. ती आपल्या आईसोबत रॉक एँड रोल हॉल ऑफ फेम गेली होती. तिथे तिने मज्जा केल्याचे आपल्या कॅप्शनमध्ये सांगितले आहे.

प्रियांकाने घालवला आईसोबत वेळ
प्रियांकासोबत तिच्या हेअरस्टायलिस्टची मुलगी कृष्णा स्कायदेखील होती. फोटोंमध्ये तिने तिला कुशीत घेतल्याचे दिसत आहे. दुसरीकडे तिची आई मधूही खूपच कूल दिसत आहेत. फोटोंमध्ये प्रियांका कॅमेऱ्यासमोर पोझ देताना दिसत आहे. तिने रंगीत प्रिंटेड ड्रेस घातला आहे. मधू चोप्राही शॉर्ट्स आणि टॉपमध्ये दिसत आहेत. यादरम्यान प्रियांकाने आपल्या आईसोबत शानदार वेळ घालवला. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शन दिले आहे की, “मला आणि माझ्या कुटुंबाला शानदार वेळ देण्यासाठी रॉकहॉल धन्यवाद.”

पाणीपुरी खाताना दिसली होती प्रियांका
मागील आठवड्यात प्रियांकाने अमेरिकेत पोहोचल्यानंतर आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. ती आपल्या न्यूयॉर्कमधील ‘सोना’ हॉटेलमध्येही गेली होती. प्रियांकाने पाणीपुरी खातानाचेही फोटो शेअर केले होते. तिचे हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते.

दीर्घ काळानंतर पती निक जोनाससोबत
दीर्घ काळानंतर प्रियांका चोप्रा यावेळी आपला पती निक जोनाससोबत लंडनमध्ये आहे. ती मागील वर्षापासून कामानिमित्त लंडनमध्ये आहे. ती ‘टेक्स्ट फॉर यू’ आणि ‘सिटॅडल’ चित्रपटाची शूटिंग करत आहे.

शेअर केला क्यूट सेल्फी
प्रियांकाने नुकताच आपला क्यूट सेल्फी शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत तिने ‘क्यूट फील करत होते, याला नंतर डिलीट करू शकते,’ असे लिहिले होते.

प्रियांका शेवटची ‘द व्हाईट टायगर’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात राजकुमार राव आणि आदर्श गौरव या कलाकारांचाही समावेश होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तेजस्विनी अन् स्वप्नीलने शेअर केले अत्यंत रोमँटिक फोटो; पाहायला मिळाली ‘समांतर २’ मधील बोल्ड केमिस्ट्रीची झलक

-बापरे बाप! ‘द कपिल शर्मा शो’साठी कपिलने केली मानधनात वाढ? एका आठवड्यासाठी घेणार ‘इतके’ कोटी

तापसीवर कंगनाची आगपाखड! म्हणाली, ‘मी सोडलेल्या चित्रपटांसाठी निर्मात्यांकडे भीक मागायची, आज तिची लायकी…’

हे देखील वाचा