Friday, March 14, 2025
Home मराठी ‘माझी भूमिका नकारात्मक असली तरी…’, मालिकेत अंतराला छळणाऱ्या श्वेताचा भूमिकेबद्दल धक्कादायक खुलासा

‘माझी भूमिका नकारात्मक असली तरी…’, मालिकेत अंतराला छळणाऱ्या श्वेताचा भूमिकेबद्दल धक्कादायक खुलासा

सध्या कलर्स वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला मालिका’ चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. मालिकेतील अंतराच्या भूमिकेत असलेल्या योगिता चव्हाणने (Yogita Chavan) सर्वांचीच मने जिंकली आहेत. पण मालिकेत सर्वात जास्त चर्चा होतेय ती अंतराच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या पूर्वा शिंदेची (purva Shinde) म्हणजेच श्वेताची. मालिकेत पहिल्यापासूनच पूर्वा शिंदेने नकारात्मक भूमिका साकारत सर्वांचे लक्ष वेधले आहे. मल्हारसोबत तिचे होणारे लग्न अंतरामुळे मोडल्याने ती राग मनात धरुन तिच्यावर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यामुळे पूर्वा सध्या मालिकेत चांगलीच चर्चेत आली आहे. मात्र या मालिकेच्या नकारात्मक भूमिकेबद्दल पूर्वाने एक धक्कादायक खुलासा केला आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, ‘लागिर झालं जी’ मालिकेत शितली सोबतच सर्वात जास्त जयडीच्या भूमिकेची चर्चा झाली होती. मालिकेत भैय्यासाहेबांच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या जयडीने आपल्या दमदार अभिनयाने सर्वांचीच मने जिंकली होती. या मालिकेने अभिनेत्री पूर्वा शिंदेला घराघरात लोकप्रियता मिळवून दिली. सध्या पूर्वा ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत श्वेताची नकारात्मक भूमिका साकारत आहे. या भूमिकेबद्दल पूर्वाने अनेक खुलासे केले आहेत. एका मुलाखतीत बोलताना तिने सांगितले की, “माझी या कार्यक्रमात नकारात्मक भूमिका असली तरी मी खऱ्या आयुष्यात खूपच मनमिळावू आणि हळवी आहे. लोक मालिकेच्या सेटवर आल्यानंतर मला भेटायला नकार देतात मात्र एकदा ते मला भेटले की त्यांचे माझ्याबद्दलचे मत बदलते.”

त्याचबरोबर “सेटवर कुणाशी जास्त चांगली मैत्री आहे?” असे विचारले असता तिने “तसं काहीही नाही माझी प्रत्येकाशीच पटकन मैत्री होते त्यामुळे सर्वांशीच माझी चांगली मैत्री आहे. तसेच सेटवर सर्वात जास्त मीच धमाल करते कारण अंतरा तिच्या मालिकेतील भूमिकेप्रमाणे मुळ आयुष्यातही तशीच घाबरट आहे” असा खुलासा तिने यावेळी केला. तसेच “माझ्या या मस्तीमुळेच मला माझ काम झालं की सगळेच सेटवरुन हाकलून देतात” असा धक्कादायक खुलासा तिने केला. दरम्यान मालिकेतील पूर्वाची भूमिका जरी नकारात्मक असली तरी तिच्या अभिनयाने मात्र सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा