Friday, March 14, 2025
Home मराठी टेलिव्हिजनवरील ‘या’ खलनायिकांचा सोशल मीडियावर जलवा, पाहायला मिळाला भन्नाट डान्स

टेलिव्हिजनवरील ‘या’ खलनायिकांचा सोशल मीडियावर जलवा, पाहायला मिळाला भन्नाट डान्स

टेलिव्हिजनवर अनेक नवीन मालिका आल्या आहेत. नवीन आलेल्या प्रत्येक मालिकेची कहाणी काही वेगळी आणि प्रेक्षकांना भावणारी आहे. यासोबत अनेक नवीन अभिनेत्रींनी देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे तर काहींनी नव्याने छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. अशातच अभिनेत्री योगिता चव्हाण हिने देखील टेलिव्हिजनवर पदार्पण केले आहे. कलर्स मराठीवरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत योगिता मुख्य भूमिकेत काम करत आहे.

अंतरा नावाच्या एका साध्या, जिद्दी, मेहनती आणि प्रामाणिक मुलीचे पात्र ती अगदी हुबेहूब निभावत आहे. तिच्या या पात्राने सगळ्यांना भुरळ. घातली आहे. या मालिकेतील खास गोष्ट म्हणजे मालिकेची नायिका जेवढी लोकप्रिय आहे तेवढ्याच या मालिकेच्या खलनायिका देखील लोकप्रिय आहेत. मालिकेतील चित्रा आणि श्वेता या नेहमीच काही ना काही कटकारस्थान करताना दिसत असतात ही पात्र अभिनेत्री पूर्वा शिंदे आणि अभिनेत्री प्रतीक्षा मुंगेकर निभावत आहेत. त्या दोघींचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Actress purva shinde and pratiksha mungekad dance video viral on social media)

दोघींनी ही त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, त्या दोघी ट्रेंडिंग गाणे ‘मेरा यार’वर डान्स करत आहेत. दोघींनीही काळ्या रंगाची पँट आणि क्रॉप टॉप घातला आहे. दोघीही अत्यंत सुंदर डान्स करताना. दिसत आहेत

त्यांचे चाहते या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया देत आहेत. त्या दोघी सेटवरून अनेकवेळा त्यांचे डान्स व्हिडिओ शेअर करत असतात.

‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत योगितासोबत अभिनेता सौरभ चौगुले हा मुख्य भूमिकेत आहेत. त्यांचे अंतरा आणि मल्हार हे पात्र सगळ्यांना खूप आवडत आहे. त्यांच्या जोडीला त्यांच्या चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत असते. त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री देखील सगळ्यांना खूप आवडते.

हेही वाचा :

अली फजलच्या पोस्टवर ‘वंडर वुमन’कडून प्रेमाचा वर्षाव, ‘या’ सिनेमात झळकणार एकत्र

महिलांच्या लिलावाबाबत जावेद अख्तरांचा थेट पंतप्रधानांना सवाल; म्हणाले, ‘हीच आहे का…?’

‘पुष्पा’च्या हिंदीच्या कलेक्शनने अल्लू अर्जुनही दंग, जाणून घ्या प्रेक्षक ‘८३’ सोडून का पाहतायत ‘पुष्पा’

 

हे देखील वाचा