कलाकार व्यक्त होण्यासाठी आता सोशल मीडियाचा सर्रास वापर करताना दिसतात. आपल्या भावना मांडण्यासाठी कोणत्याही प्रकारची बंधनं नसल्यामुळे या प्लॅटफॉर्मचा ते भरपूर वापर करतात. याच माध्यमातून अनेकांची कौतुकं केली जातात तर अनेकांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल देखील केले जाते. एका माध्यमाची पोहच देखील मोठी असल्यामुळे अनेकदा यावर येणाऱ्या भावनांवर पटकन संबंधित लोकं प्रतिक्रिया देखील देतात.
या सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या लोकांमध्ये अनेक मराठी कलाकार कलाकारांचा समावेश आहे. अशीच सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री राधिका देशपांडे. आई कुठे काय करते? मालिकेतून अरुंधतीच्या मैत्रिणीची भूमिका करणारी राधिका सध्या खूपच चर्चेत आली आहे. तिने सरकारी अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणावर संताप व्यक्त केला आहे.
राधिका देशपांडे ही तिच्या ‘सियावर रामचंद्र की जय’ या बाल-महानाट्यच्या प्रयोगात गुंतलेली आहे. शिवाय सध्या ती बालनाट्य शिबिरासाठी हॉल देखील शोधत आहे. यासाठी शासनाचा हॉल सवलतीच्या दरात मिळावा, म्हणून मागील गेल्या काही दिवसांपासून ती खूप प्रयत्न करत आहे. पण कामचोर आणि बेजबाबदार कर्मचाऱ्यांमुळे तिला यात खूप समस्या येत आहे.
यालाच अनुसरून तिने एक पोस्ट शेअर केली आहे. यासोबतच तिने सरकारी कार्यालयांमधील काही फोटो देखील पोस्ट केले आहे. या फोटोंमध्ये जुन्या फाइल्स, कचरा आदी अनेक गोष्टी दिसत आहे. या फोटोंसोबत तिने लिहिले
View this post on Instagram
“चार कागद, दोन सह्या, एक शिक्का
ताजे टवटवीत फोटो आहेत, फोटो फाईल्स मधून खेचून बाहेर काढले आहेत, खास व्हायरल मटेरियल आहेत त्यामुळे फिल्टर्स मारायची गरज नाही. तुमच्या फोन मधे दिसल्यावर पेस्ट कंट्रोल करून घ्या.
“देश बदल रहा है, तरक्की हो रही है”, ती खास करून शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची. वाह! डोळ्यात पाणी आलं हो माझ्या दृश्य बघून. इतकी देखणी आरास मांडली होती, पायघड्या घातल्या होत्या माझ्या स्वागतासाठी.
विषय साधा होता. मी सध्या बालनाट्य शिबिर घेण्यासाठी हॉल शोधते आहे. मी आणि आमची संस्था काही मोठी नाही. सरकारी बाबू लोकांसमोर तर आम्ही चिल्लर पार्टी. थुकरट वाडीतील कोणीतरी “चल हट” म्हणून बाजूला करण्या जोगे. तसा फील देणारे एक्स्पर्ट मंडळी तुम्हाला भेटतील. तिथे पिसाळ आणि मोहिते आहेत त्यांनी मला उभं पण केलं नाही, बसा म्हणतील अशी अपेक्षा धरायला मी काही वेडी नाही. मूर्ख ठरू शकते कारण काम होईल अशी भाबडी आशा बाळगून मी गेले होते.
२४ मार्च ला अर्ज भरला, शिफारस केली, चकरा मारल्या पण दगडी माणसं सगळी, धुळीत काम करून मूठभर मास चढलेल्या माणसांवर काय परिणाम होणार? सध्या वरून कोणाचा आदेश पाळण्याची जबरदस्ती नाही, त्यासाठी खुर्चीचा आवाज होईल इतकी तरी हालचाल करावी लागते. असो.
आज १८ एप्रिल. शासनाचा असलेला हॉल सवलतीच्या दरात मिळावा असे वाटले होते. पण ना आपणहून कागद हलले, ना कधी मिळेल हे कळले, ना भाडं किती बसेल हे सांगण्यात आले. काहीच घडले नाही. नाकावरची माशी हलली नाही का भुवया उंचावल्या नाहीत. कोण घेईल तेवढे कष्ट! मुजोरी तर राजवाड्यातल्या तिजोरी एवढी. खूप पाहिलेत, खूप भेटलेत, पण ह्यांना माफी नाही. कामचोर, बेजबाबदार कर्मचाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. शासन केलंच पाहिजे.
मी माघार घेतला, हार मानली नाही. माझी मुलं आणि मी नाटक करणार, हॉल मिळणार, दणदणीत प्रयोग आम्ही करणार पण माझ्या सकट बाल कलाकारांसाठी ज्यांनी हॉल उपलब्ध करून दिला नाही, त्रास नाही तर छळ केला त्यांना हे उद्याचे नागरिक धडा शिकावल्याशिवाय राहणार नाहीत. *मुद्दाम नाव घेऊन लिहिते आहे. ही माझी बाजू आहे. गोष्टीची दुसरी बाजू असू शकते.
चार कागद, दोन सह्या, एक शिक्का, असे तुमचेही अनुभव आहेत का? ढिगाऱ्यात कागद, सह्या, शिक्के, आशा, अपेक्षा, आकांक्षा खितपत, कुजत, खुंटीवर लटकलेले सापडतील. त्यांचीच रचलेली होळी तुम्ही पहायची, पेटणार नाही कारण पेट घ्यायला काटक्या, रॉकेल, काडीपेटी ते आणताहेत, पण वेळ लागेल. सोपं वाटलं काय! एक करा. सगळ्यावर पाणी फेरा, नाहीतर तोंड उघडा, शाब्दिक का असेना एक बुक्का नक्की हाणा.”
यावर अनेक लोकांनी व्यक्त होत तिच्या या पोस्टला पाठिंबा दिला आहे. राधिकाने ही पोस्ट देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, शरद पोंक्षे आणि दीपक केसरकर यांना टॅग केली आहे. दरम्यान राधिकाने होणार सून मी या घरची मध्ये देखील काम केले आहे. ती एक उत्तम लेखिका देखील आहे. तिच्या अनेक पोस्ट खूप व्हायरल होत असतात.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
परिणीती चोप्राने राघव चढ्ढासोबत लग्नाच्या बातमीवर अखेर साेडले माैन; म्हणाली, ‘माझं वैयक्तिक आयुष्य…’
गॉर्जियस शेहनाज गिलचे स्टनिंग फोटोशूट व्हायरल, एकदा पाहाच