Saturday, June 29, 2024

मोठी बातमी! ‘फँड्री’ फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात कोरोनाच्या विळख्यात, चाहतेही पडले काळजीत; व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस हा विषाणू खूप वेगाने संक्रमण करत आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या लाखोंमध्ये वाढत आहे. प्रशासन योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश देत आहेत. तरीही नागरिकांनी सगळ्या सूचनांचे पालन न केल्याने आता महाराष्ट्र सरकारने जनतेच्या सुरक्षिततेसाठी पर्यायाने लॉकडाऊनची घोषणा केली आहे. जणसामान्यांसोबत अनेक कलाकार देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. अशातच नुकतीच एक बातमी हाती आली आहे की, ‘फँड्री’ फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात हिला कोरोनाची लागण झाली आहे.

राजेश्वरीने तिच्या अधिकृत फेसबुक पेजवरून ही माहिती दिली आहे. तिने फेस बुकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात कोरोना टेस्टसाठी‌‌ तिचा स्वॅब घेतला जात आहे.

https://www.facebook.com/watch/?v=309964370500047

हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शन दिले आहे की, “मित्रांनो नुकताच माझा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तरी जे कोणी माझ्या संपर्कात आले होते त्यांनी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची चाचणी करून घ्यावी ही विनंती. मी सध्या आवश्यक ते सगळे उपचार घेत आहे. मी आता गृह‌‌ विलगीकरणात आहे. आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि प्रार्थना सोबत असुद्यात.”

तिच्या या पोस्टमुळे तिचे चाहतेही काळजीत पडल्याचे दिसत आहे. तिचे चाहते तिला कमेंट करून ‘काळजी घे,’ असा संदेश देत आहे.

राजेश्वरीचे फॅन फॉलोविंग हे जबरदस्त आहे. तिच्या सोशल मीडियावर वावरामुळे ती खूप लोकप्रिय झाली आहे. राजेश्वरीने नागनाथ मंजुळे यांच्या ‘फँड्री’ या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली. या एकाच चित्रपटाने तिला भरभरून ओळख दिली. त्यानंतर तिने ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले आहे. सध्या ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खूप चर्चित आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सल्लू प्रेमींसाठी खुशखबर, सलमानच्या नव्या गाण्याला ९ तासांत तब्बल एक कोटी हिट्स

-सोनू सूदसोबत सेल्फी काढायला कोणाला आवडणार नाही ! विमानतळावरील हवाईसुंदरीही निघाली अभिनेत्याची चाहती

-जिंकलंस भावा! अभिनेता स्वप्निल जोशीने केली मोठी घोषणा, सोशल मीडिया वापर आता करणार फक्त कोरोनासंबंधीत माहिती देण्यासाठी

हे देखील वाचा