बॉलिवूड विश्वात मनोरंजनाची कमतरता नसली, तरी इंडस्ट्रीत एक अशी अभिनेत्री आहे जिला मनोरंजनाची राणी म्हटले जाते. बॉलिवूडची ‘आयटम गर्ल’ राखी सावंत जी तिच्या एंटरटेनिंग स्टाईलसाठी ओळखली जाते. अभिनय असो, डान्स असो किंवा बिग बॉसचं घर, त्याला मनोरंजनाचा टच कसा जोडायचा हे राखीला चांगलेच माहीत आहे. कदाचित यामुळेच राखी सावंतचे भावनिक क्षण असो किंवा विचित्र कृत्ये, चाहत्यांना तिची प्रत्येक गोष्ट खूप आवडते. राखी सावंत नेहमीच तिच्या वादग्रस्त विधानांमुळे आणि अप्रतिम नाटकामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचे डान्स व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडतात यात शंका नाही. नुकताच आता तिचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर आग लावत आहे.
‘शीला की जवानी’वर राखीचा डान्स
राखीचे चित्रपटांमधील आयटम साँग्ज आजही प्रेक्षकांना डान्स करायला भाग पाडतात. सोशल मीडियावरही तिचे डान्स व्हिडिओ पाहून चाहते स्वतःला डान्स करण्यापासून रोखू शकत नाहीत. राखीने तिच्या अधिकृत इंन्टाग्राम हँडलवर असाच एक लेटेस्ट व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये राखी सावंत ‘शीला की जवानी’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओची सुरुवात एका डायलॉगने होते. ज्यामध्ये “एक पटवा पण मस्त पटवा, एकदम माझ्यासारखी” असे ऐकायला मिळते. यानंतर राखी या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये राखीने पीच कलरचा अतिशय सुंदर लेहेंगा घातला आहे. कपाळावर अप्रतिम मांग टिका आणि ती महाराष्ट्रीयन नथमध्ये कहर करत आहे.
राखीवर चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव
राखी सावंतचे नाव येताच सर्वात आधी मनात वाद येतो. राखी सावंत जिथे असते तिथे काहीतरी ना काही घडते ज्यामुळे वाद निर्माण होतो. मात्र, वादांमध्येही राखी सावंतचे लाखो चाहते आहेत. तिच्या प्रत्येक स्टाईलवर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. याच कारणामुळे सोशल मीडियावर राखीचे जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहे.
राखीच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिच्यावर लाल हृदय आणि हॉट इमोजीसह चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. कोणी राखीच्या डान्स स्टेप्सचे कौतुक करत आहेत तर कोणी तिला पिंक क्वीन म्हणत आहेत. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत ३० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-प्रभास अन् पुजा हेगडेचा ‘राधे श्याम’ रिलीझपूर्वीच लीक! ‘अशी’ काहीशी आहे चित्रपटाची कथा
-दहावीत असताना होती पहिली गर्लफ्रेंड, चित्रपटांप्रमाणेच रंगतदार होती कार्तिक आर्यनची लव्हलाईफ
-अरे वा! अखेर ‘देवमाणूस’चा पुढचा भाग येणार प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर प्रोमो व्हायरल










