Friday, August 8, 2025
Home टेलिव्हिजन अगं जरा दमानं! राखीला बनायचंय मुख्यमंत्री; म्हणाली, ‘मला मुंबईतले रस्ते हेमा मालिनींच्या कंबरेसारखे…’

अगं जरा दमानं! राखीला बनायचंय मुख्यमंत्री; म्हणाली, ‘मला मुंबईतले रस्ते हेमा मालिनींच्या कंबरेसारखे…’

अभिनेत्री राखी सावंत तिच्या बोल्ड स्टाइल आणि स्पष्टवक्ते वक्तव्यांसाठी ओळखली जाते. कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राखीच्या मुलाखती खूपच धक्कादायक आणि मनोरंजक असतात. ती तिच्या गाेष्टींनी सर्वांच्याच चेहऱ्यावर हास्य आणते. अशातच राखीने राजकारणात येण्याबाबत वक्तव्य केले आहे, ज्यामध्ये तिने मुख्यमंत्री होण्याचे तिचे स्वप्न सांगितले आहे. राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती मुख्यमंत्री झाली, तर काय करणार हे सांगत आहे.

राखी सावंत (Rakhi Sawant ) हिने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, तिला मुख्यमंत्री केले, तर काय करायला आवडेल. ती म्हणाली, “मला या देशाचा मुख्यमंत्री बनवले, तर मी हेमा मालिनी यांच्या गोऱ्या गालासारखा आणि गोऱ्या कंबरेसारखा रस्ता बनवेल. त्या जितक्या सुंदर ‘ड्रीमगर्ल’ आहेत, तसाच मी रस्ता बनवेल. तसेच, आपल्या भारतात प्रत्येक रस्त्यावर खड्डे आहेत. त्या खड्ड्यांना मी हेमा मालिनी यांचे सौंदर्य, त्यांचा चेहरा, त्यांचे शरीर, त्यांची कंबर त्यापुढे मी जाणार नाही. तुम्ही लोक गमतीत घेऊ नका. जर मोदीजी चहा बनवता- बनवता पीएम झाले, तर मी बसून- बसून, झाेपत- झाेपत, हसत- हसत सीएम का बनू शकत नाही भावा.”

हेमा मालिनीने केले हाेते वक्तव्य
नुकतेच हेमा मालिनी यांनी त्यांच्या एका वक्तव्यात राखी सावंतचे नाव घेतले होते. पत्रकारांनी त्यांना कंगना रणाैतबद्दल प्रश्न विचारला हाेता. ज्याच्या उत्तरात हेमा मालिनी म्हणाल्या, “तुम्हाला फिल्मस्टार्स हवे आहेत? उद्या राखी सावंतचेही नाव येऊ शकते.” हेमा मालिनी यांच्या या वक्तव्यावर राखी सावंतने प्रतिक्रिया दिली आहे.

राखी सावंतने दिले हाेते प्रतिउत्तर
राखी सावंतने साेशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला हाेता. ज्यात तिने म्हणटले हाेते की, “आज मी खूप आनंदी आहे. खरंतर हे गुपीत हाेतं की, मी यावर्षी 2022ची निवडणुक लढणार आहे. याविषयी मोदीजी आणि अमित शहा माझ्याबद्दल सांगणार होते. मात्र, मोदीजी असोत किंवा हेमाजी माझ्यासाठी एकच. मी खूप आनंदी आहे कराण आता मी निवडणूक लढणार आहे. तुम्ही सगळे मला साथ देणार ना? थँक्यू हेमा मालिनीजी तुम्ही माझ्यासाठी इतकं चांगलं वक्तव्य केलेत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

राखी विषयी बाेलायचे झाले, तर राखी साेशल मीडियाच्या माध्यामांतुन कायमच चाहत्याच्या संपर्कात असते. ती इंस्टाग्रामवर विविध फाेटाे आणि व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांना आकर्षित करते. चाहते तिच्या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अरुण बाली यांच्या निधनाने पूर्णपणे तुटली नीना गुप्ता; भावूक पाेस्ट चर्चेत

शाहरुखच्या बाजूला असलेला चिमुकला आहे तरी काेण? पठ्याने सलमान अन् रणबीरच्या ताेंडातला हिसकावलाय घास

हे देखील वाचा