Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड राखी सावंतने परिधान केला ‘असा’ ड्रेस, ‘वेडी म्हातारी,’ म्हणत नेटकऱ्यांनीही केले जोरदार ट्रोल

राखी सावंतने परिधान केला ‘असा’ ड्रेस, ‘वेडी म्हातारी,’ म्हणत नेटकऱ्यांनीही केले जोरदार ट्रोल

बॉलिवूडमधील अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या नवनवीन ड्रेसमधील फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. त्या आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच त्यांच्याबद्दल काही ना काही माहिती देत असतात. याचप्रमाणे बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत देखील तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. ती सतत वेगवेगळे ड्रेस परिधान करून चाहत्यांना हसवत असते. अलीकडेच ती फिल्मफेअर अचिव्हर नाईटमध्ये असा ड्रेस घालून गेली होती, ज्याची युजर्स सोशल मीडियावर खिल्ली उडवत आहेत. युजर्स तिला ‘वेडी म्हातारी,’ म्हणत आहेत. काही युजर्सनी तिच्या सौंदर्याचे आणि आत्मविश्वासाचे कौतुक देखील केले आहे.

राखी तिच्या मस्त स्टाईल आणि फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. मात्र, तिच्या फॅशन सेन्सची अनेकदा खिल्ली उडवली जाते. यावेळीही असेच काहीसे घडले आहे. फिल्मफेअर अचिव्हर नाईट पार्टीमध्ये हा प्रकार घडला आहे. ती येथे पोशाख परिधान करून आली होती, ज्याची सोशल मीडियावर जोरदार खिल्ली उडवली जात आहे.

राखीने पार्टीत अरेबियन स्टाईलचा ड्रेस परिधान केला होता. तिने मॅचिंग स्कार्फ आणि डोक्यावर मुकुट घातला होता. राखीने या ड्रेसखाली ब्लॅक जीन्स आणि हाय लेन्थ बूट घातले होते. तिने खूप छान मेकअप केला होता आणि तिच्या डोळ्यात काजळ लावले होते. राखी या आऊटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत होती आणि फोटोसाठी छान पोज देत होती.

राखीचे हे फोटो सोशल मीडियावर येताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आणि त्यांनी तिच्या लूकची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. एका युजरने लिहिले की, “वेडी म्हातारी, लोक कसे प्रसिद्ध होतात हे माहित नाही.” दुसऱ्या युजरने राखी सावंतला “वृद्ध आंटी,” म्हणून संबोधले आणि त्याच्या कमेंटमध्ये संतप्त इमोजीचा समावेश केला आहे.

राखीचे काही चाहते तिच्या लूकचे कौतुक करत आहेत. एका महिला युजरने तिच्या आत्मविश्वासाचे कौतुक केले आहे. तिने लिहिले की, “राखीसारखे व्हा, पण मी तिच्या आत्मविश्वासाची कौतुक करते, म्हणजेच ती आग आहे.”

अलीकडेच, राखी सावंतने करवा चौथच्या निमित्ताने हेवी दागिने आणि लाल रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत होती. त्या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मोठी बातमी! आर्यन खान आर्थर रोड कारागृहातून बाहेर, लवकरच होणार मन्नतवर रवाना

-खान कुटुंबाची ‘मन्नत’ पूर्ण! अखेर २७व्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात झाले आर्यन खानचे स्वागत

-काय सांगता! जामीन तर मिळणार, परंतु न्यायालयाने आर्यनसमोर ठेवल्या ‘या’ एकूण ११ अटी

हे देखील वाचा