Friday, July 5, 2024

मास्क न घालता रस्त्यावर ईद साजरी करत होती मुलगी, राखी सावंतने शिकवला चांगलाच धडा; पाहा व्हायरल व्हिडिओ

आपल्या बेधडक अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रींमध्ये राखी सावंतचाही समावेश होतो. ती नेहमीच बिंधास्त असते. मग मुलाखत द्यायची असो किंवा मग पॅपराजींशी संवाद साधायचा असो सर्वत्र ती आपल्याच धुंदीत असते. यादरम्यान ती नेहमीच असे काही बोलून जाते, जेणेकरून त्याचा व्हिडिओ क्षणार्धातच व्हायरल होतो. अशातच आता राखीचा आखी एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती मास्क न घालता रस्त्यावर ईद साजरी करणाऱ्या एका मुलीला फटकारताना दिसत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत राखी त्या मुलीला म्हणते की, “तुझा मास्क कुठे आहे? तुम्ही लोक असा निष्काळजीपणा करू नका. कोरोनाची तिसरी लाट येणार आहे.” असे म्हणताच समोरची मुलगी म्हणते की, “मास्क उडून गेला आहे.”

यावर प्रत्युत्तर देत राखी म्हणते की, “चिमणी होती का, जी उडून गेली?” राखीच्या या बोलण्यावर तिथे उपस्थित मुलीही खदखदून हसू लागतात. यानंतर राखी कोणाकडून तरी त्या मुलीसाठी मास्क मागवते आणि आपल्या समोर तिला मास्क घालायला सांगते.

मुलींना देते ईदी
राखी, त्या मुलींना ईदच्या निमित्ताने पैसेही देते. परंतु त्या मुली तिच्याकडून पैसे घेण्यास नकार देतात. पुढे राखी म्हणते, “घ्या घ्या. हा राखी सावंतचा पैसा आहे राखीच्या प्रामाणिकपणा आणि मेेहनतीचा पैसा आहे.” राखीने सक्ती केल्यानंतर मुली पैसे घेतात. यादरम्यान राखी त्यांच्यासोबत फोटोही काढते.

बिग बॉसमध्ये रितेशबद्दल खुलासा केल्याने बसला होता ओरडा
राखीने सांगितले होते की, तिचा पती रितेशने तिच्यासोबत लग्न या कारणामुळे केले की, कारण ती त्याला या अडचणीतून बाहेर काढू शकेल. परंतु राखीने त्याला आधीच सांगितले होते की, तो मोठा व्यावसायिक आहे, तर ती सार्वजनिकरीत्या लग्न करू शकत नाही.

तिने असेही सांगितले की, रितेश तिच्यावर ओरडला होता की, तिने बिग बॉसमध्ये त्याच्याबद्दल चर्चा का केली. तसेच हे का सांगितले की, तो आधीपासून विवाहित आहे. राखीने म्हटले होते की, “मी लॉकडाऊनमध्ये ७-८ महिने डिप्रेशनमध्ये काढले. कोणालाही माहिती नव्हते की, मी कोणत्या गोष्टीतून जात होते.”

राखीने यादरम्यान हेही सांगितले की, रितेशच्या बहिणीने तिला त्याच्या आधीच्या लग्नाबद्दल सावध केले होते.

रितेशशी तुटले नाते, पुन्हा नाही करणार लग्न
राखीने नुकतेच म्हटले होते की, जर रितेशसोबत तिचे नाते व्यवस्थित राहिले नाही आणि दोघेही वेगळे झाले, तर ती लग्न करणार नाही.

राखीने सांगितले की, रितेशने तिची आणि तिच्या आईची पूर्ण काळजी घेणार असल्याचे म्हटले आहे. तसेच त्याने वचन दिले आहे की, तो तिला मुंबईत फ्लॅट घेऊन देणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अरे व्वा! अगस्त्यने टाकले पहिले पाऊल, हार्दिक आणि नताशाने केला व्हिडिओ शेअर

-‘ओव्हर ऍक्टिंगचे ५० रूपये कट करा’, लस टोचवताना मराठी अभिनेत्रीची नौटंकी पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल!

हे देखील वाचा