Friday, January 3, 2025
Home बॉलीवूड रकुलप्रीत सिंग अंमलबजावणी संचालनालयात झाली दाखल, अभिनेत्रीची ईडीकडून झाडून चौकशी सुरू

रकुलप्रीत सिंग अंमलबजावणी संचालनालयात झाली दाखल, अभिनेत्रीची ईडीकडून झाडून चौकशी सुरू

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्युनंतर ईडी नावाची शिडी सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकाराच्या दारी पोहचली आहे. अशात या प्रकरणी बॉलिवूडमधील कलाकारांसह टॉलिवूडमधील कलाकारांचा देखील समावेश आहे. यामध्ये अंमलबजावणी संचालनालयाच्या हाती अनेक नवीन धागे दोरे लागत आहेत. तसेच या आधी अमली पदार्थांप्रकरणी धूळ खात पडलेल्या फाईल पुन्हा एकदा उघडण्यात आल्या आहेत. तसेच २ सप्टेंबर रोजी सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याने आपला जीव गमावला, असे डॉक्टरांनी सांगितले. परंतु तरी देखील अनेक जाणकार मंडळी ड्रग्स प्रकरणाशी याचा संबंध असल्याची शंका बाळगून आहेत. अशात अंमलबजावणी संचालनालयाची सुई आता रकुल प्रीत सिंग या अभिनेत्रीपर्यंत येऊन पोहचली आहे.

रकुलचा या प्रकरणात नेमका काय संबंध आहे
साल २०१७ मध्ये ‘तेलंगणा उत्पादन शुल्क आणि निषेध विभागाने’ ३० लाख रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी त्यांनी १२ जणांवर गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने हा तपास स्वतःकडे घेत या प्रकरणाचा छडा मनी लाँड्रिंगच्या दिशेने लावायला सुरुवात केली. यामध्ये ११ जणांवर चार्जशीट दाखल करण्यात आली होती. सध्या या प्रकरणी टॉलिवूडमधील काही दिग्दर्शक आणि कलाकारांना ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे. यामध्ये टॉलिवूड तसेच बॉलिवूड अभिनेत्री रकुलला देखील ईडीने समन्स बजावले आहे. अभिनेत्री शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयामधील संचालक एजन्सीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर झाली आहे. अमली पदार्थांप्रकरणी ईडीने जुनी प्रकरणं देखील खोदून काढल्याने बॉलिवूडसह टॉलिवूडमधील कलाकारांचे धाबे दणाणलेत. (Actress Rakul Preet Singh arrives at enforcement directorate office in in connection with drugs case)

रकुल प्रीत सिंगच्या अभिनयाविषयी बोलायचे झाले, तर या अभिनेत्रीने कलाक्षेत्रात आपल्या अभिनयाच्या जोरावर दमदार कामगिरी केली आहे. अभिनेत्रीने २००९ साली प्रदर्शित झालेल्या ‘गिल्ली’ या दाक्षिणात्य चित्रपटातून सिने सृष्टीमध्ये पदार्पण केले. काही दिवसांपूर्वी तिची ‘दिल है दिवाना’ आणि ‘ना दुजा कोई’ ही गाणी चांगलीच चर्चेत होती. तसेच ईडीच्या समन्समळे तिला सध्या ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बंसी बिरजू’ भोजपुरी चित्रपटाचं गाणं झालं प्रदर्शित, अल्पावधितच ‘इतके’ व्ह्यूज मिळवून केला राडा!

-कोणासोबत राहतात अभिनेते दिलीप प्रभावळकर? जाणून घ्या ‘पछाडलेला’मधील इनामदार भुसनाळेच्या कुटूंबाबद्दल
-Bigg Boss OTT: शमिता शेट्टीला पसंत करू लागलीये राकेश बापटची फॅमिली; बहिणीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा