Tuesday, July 9, 2024

बिग बॉसपेक्षा जास्त पैसे मी बाहेर राहून कमावू शकते, म्हणत ‘या’ भोजपुरी अभिनेत्रीने धुडकावली ऑफर

 

कलर्स वाहिनीवरील बिग बॉसच्या १५ व्या पर्वाला दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवसापासूनच हा कार्यक्रम चर्चेत आला आहे. बिग बॉसच्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित लोक सहभागी होत असतात. आजपर्यंत राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. दरवर्षी बिग बॉसच्या चाहत्यांना सहभागी कलाकार कोण कोण आहेत हे जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता लागलेली असते. हिंदी सिनेसृष्टीसोबत अलीकडच्या काळात बिग बॉसमध्ये भोजपुरी कलाकारांना सुद्धा आमंत्रित केले जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत बिग बॉसमध्ये खेसारी लाल यादव, रवि किशन, मोनालिसा, अक्षरा सिंह, संभावना सेठ हे भोजपुरी कलाकार झळकले आहेत. यंदाच्या पर्वासाठी बिग बॉसमध्ये राणी चटर्जी या भोजपुरी अभिनेत्रीला आमंत्रित करण्यात आले होते. परंतु तिने बिग बॉसच्या आयोजकांचे आमंत्रण धुडकावून लावले आहे. राणी चॅटर्जी ही भोजपुरी इंडस्ट्रीमधील आघाडीची अभिनेत्री आहे. तिच्या चाहत्यांची संख्या करोडोंच्यावर आहे. त्यामुळेच तिचे चाहते तिला बिग बॉस मध्ये पाहण्यासाठी उत्सुक होते, परंतु राणी चटर्जीने या खेळात सहभागी होण्यास नकार दिला आहे. आणि त्याचे कारण सुद्धा तिने सांगितले आहे.

बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासंबंधी बोलताना राणी चॅटर्जीने सांगितले की, “बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी मला अनेक वर्षांपासून बोलावले जात आहे. गतवर्षी माझ्या टीम सोबत बिग बॉसच्या आयोजकांचे बोलणेही झाले होते. परंतु इतक्यात मी बिग बॉसमध्ये सहभागी होऊ इच्छित नाही. बिग बॉस मध्ये जितके पैसे मिळतील तेवढे मी बाहेर राहूनही कमवू शकते. त्यामुळे बिग बॉस मध्ये सहभागी होण्यास मला काही रस नाही.” असेही तिने स्पष्ट केले. याबाबत पुढे बोलताना ती म्हणाली, “बिग बॉस हा दीर्घकाळ चालणारा कार्यक्रम असून माझ्याकडे बाकीचे ही बरेच प्रोजेक्ट आहेत, जिकडे मला वेळ द्यायचा आहे.”

दरम्यान, राणी चॅटर्जी ही भोजपुरी चित्रपट सृष्टीतील खुप प्रसिद्ध अभिनेत्री असून, तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर पूर्ण भारतभर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. राणी चॅटर्जी अभिनयाबरोबर तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही बरीच चर्चेत असते. कोणत्याही मुद्दयावर ती तिचे मतं ठामपणे मांडताना दिसून येते.

मध्यंतरी राणीने आपले वाढलेले वजन कमी केल्याने ती चर्चेत आली होती. तिच्यातल्या ह्या बदललेल्या लुकची माध्यमात जोरदार चर्चा झाली होती. व्हिडिओ आणि फोटो मधून राणीने तिच्या फिटनेसच रहस्य उघड केले होते. तिच्या चाहत्यांना तिचा नवीन लुक खूपच आवडला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आर्यन खानला देण्यात आलीत विज्ञानाची पुस्तके, इतर आरोपींप्रमाणे त्यालाही मिळतंय नॅशनल हिंदू रेस्टॉरंटमधील जेवण

-‘ते तर या पार्टीमध्ये जाण्यास तयार देखील नव्हते…’, आर्यनचा मित्र अरबाज मर्चंटच्या वडिलांनी सोडले मौन

-शर्लिन चोप्राचा शाहरुख खानवर गंभीर आरोप; म्हणाली, ‘त्याच्या पार्टीत लोक पांढऱ्या पावडरचे सेवन…’

हे देखील वाचा