Monday, July 1, 2024

पांढऱ्या रंगाच्या चादरमध्ये ‘ही’ अभिनेत्री दिसली टॉपलेस, फोटो शेअर करत म्हणतेय ‘वो पहला प्यार’

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री राणी चॅटर्जी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती चित्रपटांव्यतिरिक्त आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेहीच चर्चेचा विषय ठरत असते. नुकतेच तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती एका सिल्क चादरमध्ये लपेटलेली दिसत आहे. तिच्या या बोल्ड अंदाजातील फोटो जोरदार व्हायरल होत आहे.

राणीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर करत लिहिले की, ‘लवकरच येत आहे इंटेंस लव्हस्टोरी… वो पहला प्यार!’ यासोबतच तिने अभिनेता हितेन तेजवानीलाही टॅग केले आहे. या फोटोत राणी बेडवर टॉपलेस लूकमध्ये बसलेली दिसत आहे. तिने स्वत:ला पांढऱ्या रंगाच्या चादरने झाकले आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. एका चाहत्याने तिच्या फोटोवर ‘क्युटीपाय’ अशी कमेंट केली आहे.

https://www.instagram.com/p/CMuJHraAxLW/?utm_source=ig_web_copy_link

खरं तर राणी सध्या आपल्या ‘वो पहला प्यार’ या आगामी वेब सीरिजच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. असे म्हटले जात आहे की, राणीचा हा फोटो तिच्या आगामी वेब सीरिजमधीलच आहे. या वेब सीरिजमध्ये ती अभिनेता हितेन तेजवानीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

‘वो पहला प्यार’ ही वेब सीरिज इशू गंभीर एन्टरटेन्मेंट आणि माही फिल्म्स युनिव्हर्सल प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत आहे. मागील काही दिवसांमध्ये राणीने आपल्या इंस्टाग्रामवर हितेनसोबतचे फोटो शेअर केले होते. या नवीन वेब सीरिजसाठी राणी खूपच उत्साहित आहे.

राणी चॅटर्जी भोजपुरी चित्रपटसृष्टीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या चित्रपटांसोबतच तिचे धमाकेदार गाणेही चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतात. ती इंस्टाग्रामवर आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधण्यासाठी नेहमी फोटो शेअर करताना दिसते. दुसरीकडे इंटरनेटवरही राणीच्या बोल्ड फोटोंनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.

राणीने आतापर्यंत ‘घरवाली बाहरवाली’, ‘जानम’, ‘नागिन’, ‘दीवाना’, ‘दरिया दिल’, ‘प्रेम दीवानी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा- 

-विष्णू विशाल आणि ज्वाला गुट्टा चढणार लग्नाच्या बोहल्यावर? अभिनेत्याने केली मोठी घोषणा

-‘या’ अभिनेत्याचे ट्रान्स्फॉर्मेशन पाहून तुम्ही व्हाल थक्क, केले तब्बल १८ किलो वजन कमी

-नादच खुळा! यूट्यूबवर १०० कोटी व्ह्यूजचा टप्पा पार करणारी पहिली युवा गायिका; ‘या’ दोन गाण्यांनी बनवला विक्रम

हे देखील वाचा