Tuesday, July 9, 2024

वयाची तिशी ओलांडूनही अविवाहित आहेत ‘या’ ७ भोजपुरी अभिनेत्री, एकीचा एमएमएस झाला होता लीक

चित्रपटसृष्टीत सौंदर्याची खाण असलेल्या अनेक अभिनेत्री आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या सहजसुंदर अभिनयाने या अभिनेत्रींनी चित्रपटसृष्टीत आपले एक मानाचे नाव मिळवले आहे. यातील काही अभिनेत्रींनी कारकिर्दीच्या शिखरावर असताना थाटात लग्न केले. मात्र, काही अभिनेत्री अशा आहेत, ज्यांनी वयाची तिशी पार केली आहे, तरीही त्यांनी लग्न केलेले नाही.

आपण भोजपुरी चित्रपटसृष्टीतील त्या अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी वयाची तिशी पार करूनही लग्न केलेले नाही. या यादीत प्रसिद्ध अभिनेत्री अक्षरा सिंगपासून ते राणी चॅटर्जीपर्यंत अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. (Actress Rani Chatterjee To Akshara Singh 7 Bhojpuri Actresses Who Is Still Unmarried Check List)

वयाची तिशी पार होऊनही अविवाहित आहेत ‘या’ भोजपुरी अभिनेत्री

१. राणी चॅटर्जी
अभिनेत्री राणी चॅटर्जी २०० पेक्षाही अधिक भोजपुरी चित्रपटात झळकली आहे. ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी तयारी करत आहे. मागील वर्षी राणीने मनदीप बामरासोबतचे आपले नाते अधिकृत केले होते. दोघांनीही लग्नाच्या तयारीला सुरुवात केली होती. मात्र, काही कारणास्तव दोघांचे नाते तुटले. राणीचे वय ३३ वर्षे आहेत. मात्र, अजूनही ती अविवाहित आहे. ती सध्या आपल्या कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करत आहे.

२. आम्रपाली दुबे
आम्रपाली दुबे ही भोजपुरीतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. दिनेश लाल यादव उर्फ ​​निरहुआसोबत तिने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ३४ वर्षे वयाची आम्रपाली अजूनही अविवाहित आहे.

३. मधू शर्मा
क्वचितच असा कोणताही भोजपुरी सुपरस्टार असेल ज्याच्यासोबत मधू शर्माने काम केले नसेल. भोजपुरी चित्रपटसृष्टीत ती तिच्या बोल्डनेससाठी खूप प्रसिद्ध आहे. मधू शर्मा आता ३६ वर्षांची असून अजूनही तिला कोणीही जोडीदार मिळालेला नाही, ज्याच्याशी ती सेटल होईल, असे खुद्द मधू शर्मा सांगते.

४. स्वीटी छाब्रा
स्वीटी छाब्रा हे भोजपुरी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. पवन सिंगसोबतची तिची जोडी सुपरहिट आहे. तिने तिच्या अर्ध्याहून अधिक करिअरमध्ये पवन सिंगसोबत काम केले आहे. तिनेही वयाची तिशी ओलांडली आहे, पण अजून कोणाला आपला जीवनसाथी बनवण्याचा निर्णय तिने घेतलेला नाही.

५. अनारा गुप्ता
वयाची तिशी ओलांडलेली अनारा गुप्ता भोजपुरी चित्रपटसृष्टीमध्ये खूप लोकप्रिय आहे. तिने ‘मिस जम्मू’चाही किताब पटकावला आहे. अनारा प्रिन्स सिंगसोबत रिलेशनशिपमध्ये आहे, पण तिने लग्न केलेले नाही. लग्नाबाबत ती सांगते की, अजून काहीही विचार झालेला नाही. माध्यमांतील वृत्तांनुसार, अनारा गुप्ताचा एक एमएमएसही लीक झाला आहे.

६. अक्षरा सिंग
भोजपुरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अक्षरा सिंगनेही अद्याप लग्न केलेले नाही. अक्षरा सिंगचे भोजपुरी सुपरस्टार पवन सिंगसोबत बरेच दिवस अफेअर होते. आज जरी दोघे वेगळे असले, तरीही भोजपुरीमध्ये आजही दोघांच्या चर्चा रंगत आहेत. अक्षरा सिंग केवळ २८ वर्षांची असून ती तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे.

७. काजल राघवानी
भोजपुरी अभिनेत्री काजल राघवानीचाही या यादीत समावेश आहे. काजलनेही वयाची तिशी ओलांडली आहे.

मात्र, अभिनेत्री अजूनही अविवाहित आहे. तिला लग्न करताना पाहण्याची चाहत्यांची इच्छा आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रियांका चोप्राच्या ‘तिनका तिनका’ गाण्यावर मोनालिसाने लावले जोरदार ठुमके, व्हिडिओ पाहिला का?

-‘असे’ केल्यास प्रियांका चोप्राला बसू शकतो पती निकचा मार, स्वतः केला खुलासा

-बॉलिवूडमध्ये १४ वर्ष पूर्ण केलेल्या रणबीर कपूरने नाकारले होते ‘हे’ सहा सुपरहिट सिनेमे

हे देखील वाचा