Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘जबरे पिया’ गाण्यावर बेभान होऊन नाचली रश्मी देसाई, सुंदरता पाहून नजरच हटणार नाही

टेलिव्हिजन जगतातील अनेक अभिनेत्रींचा सोशल मीडियावर चांगलाच वावर असतो. यामध्ये अभिनेत्री रश्मी देसाई हिचाही समावेश आहे. रश्मीला इंस्टाग्राम अकाऊंटवर तब्बल ५५ लाखांहून अधिक चाहते फॉलो करतात. त्यामुळे तिने पोस्ट शेअर करताच, लगेच ती व्हायरल होते. अशातच तिने एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत ती जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. इतकेच नाही, तर हा व्हिडिओ पोस्ट होताच, तुफान व्हायरल होत आहे.

अभिनेत्री रश्मीने लावले ठुमके
अभिनेत्री रश्मी देसाई (Rashami Desai) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे. रश्मी ‘टीटू अंबानी’ या आगामी बॉलिवूड सिनेमात झळकणार आहे. या व्हिडिओत ती या सिनेमातील ‘जबरे पिया’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. प्रसिद्धी पिपासू रश्मीचा लूक गुलाबी साडीत एकदम सुंदर आणि हॉट दिसत आहे. इतकेच नाही, तर रश्मीचा डान्स पाहून कोणालाही तिच्या या व्हिडिओवरून नजर हटवणे जरा कठीणच होईल. सोशल मीडियावर रश्मीच्या या व्हिडिओला चांगली पसंती मिळत आहे. तसेच, चाहतेही या व्हिडिओवर तुफान लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

रश्मीच्या या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास ३ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, २४ हजारांहून अधिक लाईक्स आणि ३ हजारांहून अधिक कमेंट्सही मिळाल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिले की, “एकच हृदय आहे किती वेळा जिंकशील.” तसेच, दुसऱ्या एकाने लिहिले की, “तुझ्या डान्सवरून नजरच हटत नाही.”

आपल्या मित्रांसाठी केला डान्स
खरं तर रश्मी देसाई हिने हा व्हिडिओ आपली मैत्रीण आणि टीव्ही अभिनेत्री दीपिका सिंग (Deepika Singh) हिच्या आगामी ‘टीटू अंबानी’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी बनवला आहे. हा व्हिडिओ शेअर करत रश्मीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “दीपिका जबरे पियावर डान्स फक्त तुझ्यासाठी. तुला खूप खूप शुभेच्छा आणि तुझ्या टीटू अंबानी या आगामी सिनेमासाठी अभिनंदन.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Rashami Desai (@imrashamidesai) 

खास बाब अशी की, ‘दीया और बाती हम’ फेम अभिनेत्री दीपिका सिंग हिचा ‘टीटू अंबानी’ (Titu Ambani) हा सिनेमा येत्या ८ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

अधिक वाचा-

लग्नाच्या आधी सेक्स आणि प्रेग्नंसीवर दियाचे बेधडक वक्तव्य; म्हणाली, ‘हे सगळ्यांनाच जमत नाही…’

आलिया ते प्रियांका, ‘या’ अभिनेत्री आहेत फॅशन ब्रँड्सच्या मालकीण, कपड्यांच्या किंमती खिशाला परवडणाऱ्या

समंथा- नागाच्या नात्यात करण जोहरनं कालवलं विष? अभिनेत्रीने केलाय धक्कादायक खुलासा

हे देखील वाचा