Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

उमर रियाझसोबतच्या नात्यावर अखेर खुलेपणाने बोलली रश्मी देसाई; खरं काय ते सगळं सांगितलं

‘बिग बॉस १५’च्या घरात ‘वाइल्ड कार्ड’ म्हणून प्रवेश करूनही टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई (Rashami Desai) शोच्या ग्रँड फिनालेमध्ये आपली जागा बनवण्यात यशस्वी झाली. या ‘बिग बॉस’च्या प्रवासात उमर रियाझसोबतची(Umar Riaz) तिची मैत्री चांगलीच रंगली होती. घराबाहेरच्या चाहत्यांनीही या दोघांची नावे जोडत ‘उमरश’ या हॅशटॅगचा ट्रेंड केला होता. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत, रश्मीने तिच्या आणि उमर रियाझच्या मैत्रीबद्दल मोकळेपणाने सांगितले. त्यांच्या बाँडिंगबद्दल बोलताना रश्मी म्हणाली की, उमर आणि ती एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत.

रश्मी देसाई पुढे म्हणाली की, “मित्र असण्यासोबतच आम्ही दोघेही एकमेकांचा आदर करतो. आमच्यात चांगली समज आहे आणि कदाचित लोकांना तीच गोष्ट आवडेल.” रश्मीने बिग बॉसच्या ग्रँड फिनालेदरम्यान सलमान खानसमोर (Salman Khan) खुलासा केला होता की, उमर आणि ती फक्त मित्र आहेत आणि त्यापेक्षा जास्त काही नाही. रश्मीने केलेल्या संभाषणात ती शमिता शेट्टीच्या (Shamita Shetty) घरी झालेल्या बर्थडे पार्टीबद्दलही बोलली.

बिग बॉसच्या घरात शमितासोबत खास नातं
शमिताच्या वाढदिवसाच्या पार्टीत सामील होण्यापूर्वी रश्मी देसाई खूप घाबरली होती. ‘बिग बॉस’च्या घरात दोघींमध्ये खूप चांगली मैत्री होती आणि शमिता देखील रश्मीच्या हृदयाच्या खूप जवळ आहे. पण शमिता वेगळ्या बॅकग्राऊंडमधून आली आहे आणि यामुळेच रश्मी खूप नर्व्हस होती. पण ती म्हणाली की, शमिता आणि तिचे जवळचे लोक अगदी घरातल्यासारखे आहेत. एक वेगळीच संस्कृती तिथे पाहायला मिळाली. पण सगळ्यांनी तिच्याशी खूप प्रेमाने संवाद साधला.

नेहा भसीनला भेटल्याने रश्मी देसाई आहे खूश
शमिताच्या पार्टीत ती नेहा भसीनला (Neha Bhasin) भेटल्याचे रश्मीने सांगितले. नेहाशी पहिल्यांदा बोलणे तिला खूप आवडले. बिग बॉसच्या घरात नेहासोबत असती, तर घरात आणखी मजा आली असती असे तिला वाटते. नेहाच्या सांगण्यावरून तिने राजीव आणि उमरसोबत ‘पुष्पराज’च्या गाण्यावरही रील बनवली. रश्मीचा असा विश्वास आहे की, बिग बॉसचा हा प्रवास तिचा एकटीचा नव्हता, तर तिच्यासोबत तिच्या सर्व चाहत्यांनीही एक अविस्मरणीय प्रवास पूर्ण केला आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा